Colombia earthquakes : महाभयंकर भूकंपाने जमीन थरथरली; आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक संसार उद्ध्वस्त
कोलंबियामध्ये भूकंपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर 87 जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे 1575 घरांचे नुकसान झाले आहे. तर अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तर 61 इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. भूकंपानंतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
कोलंबियात शक्तीशाली भूकंप झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू आहे. पश्चिम कोलंबियातील काली, क्विब्डो, परेराच्या आसपासच्या भागांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या भूकंपामुळे 1600 इमारतींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्यांनुसार, सोमवारी दुपारपर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बेपत्ता नागरिकांचाही शोध घेण्यात येत आहे. भूकंपानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू चोको या शहरात होता. कोलंबियामधील सर्वात गरीब वस्ती असलेलं शहर आहे. या भागात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या समूहाचं वास्तव्य आहे. या घटनेने लहान मुले आणि तरुणांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. काही भागांत घटनाट जंगलात पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे बचाव पथक जलमार्ग आणि हवाईमार्गाचा वापर करत आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्षांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. हा भूकंप कोलंबियातील सर्वात शक्तीशाली भूकंप असल्याचे बोलले जात आहे.
Colombia: At least 132 killed, 570 injured in magnitude 7.4 earthquake
Read @ANI Story | https://t.co/Is2PKEFDEb#Colombia #earthquake #deathtoll pic.twitter.com/9k3wpYXfLS
— ANI Digital (@ani_digital) August 11, 2026
कोलंबियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांनी भूकंपानंतर तातडीने मदतीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर लष्कर आणि बचाव पथकांना जागोजागी मदतीसाठी पाठवण्यात आलं आहे. भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा जीव वाचवणे, जखमींवर उपचार करण्यावर भर दिला जात आहे. सध्या कोलंबियामध्ये मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. या घटनेनंतरही नागरिकांना भूकंपांच्या धक्क्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.