ड्रोनने शहरात जेवण आणि आयस्क्रिमची डिलीव्हरी, इस्रायलमध्ये अद्यायावत ड्रोन कार्यक्रम सुरु, जगभरात लवकरच नवी सप्लाय चैन

| Updated on: Oct 12, 2021 | 6:10 PM

इस्रायलच्या तेल अवीव शहरावर सोमवारी डझनभर ड्रोन उडताना दिसले, त्यांनी शहरभर आइस्क्रीम आणि सुशी (भातापासून बनवलेला जपानी पदार्थ) ची डिलीव्हरी केली. हा एक प्रयोग होता.

ड्रोनने शहरात जेवण आणि आयस्क्रिमची डिलीव्हरी, इस्रायलमध्ये अद्यायावत ड्रोन कार्यक्रम सुरु, जगभरात लवकरच नवी सप्लाय चैन
इस्रायलमध्ये ड्रोनद्वारे खाद्यपदार्थांची डिलीव्हरी (प्रातिनिधीक फोटो)
Follow us on

Drone Deliver Sushi, Ice Cream in Isreal: जगभरात संरक्षण क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही ड्रोन वापरण्यासाठी नवीन प्रयोग केले जात आहेत. इस्रायलने या दिशेने एक पाऊल पुढे गेले आहे. इस्रायलमध्ये ड्रोनचा उपयोग खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी केला जात आहे. इस्रायलच्या तेल अवीव शहरावर सोमवारी डझनभर ड्रोन उडताना दिसले, त्यांनी शहरभर आइस्क्रीम आणि सुशी (भातापासून बनवलेला जपानी पदार्थ) ची डिलीव्हरी केली. हा एक प्रयोग होता. (Commercial drones deliver ice cream sushi in israel tel aviv city)

ही प्रयोग नॅशनल ड्रोन इनिशिएटिव्ह या इस्रायलच्या सरकारी कार्यक्रमांतर्गत करण्यात आला आहे. ज्यामध्ये शहरातील गर्दी कमी करण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याची योजना आहे. जेणेकरुन मालाचा पुरवठा अत्यंत सुलभ होईल. इस्रायली कंपन्या ड्रोन तंत्रज्ञानात जगात अव्वल स्थानावर आहेत, याच कंपन्या आता मालवाहतूक आणि फूड डिलीव्हरी चैनचा भाग होण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर जगभरात आकाशात फक्त ड्रोनच उडताना दिसतील.

प्रकल्पाचा तिसरा टप्पा सुरू

8 टप्प्यांमध्ये हे प्रयोग होणार आहे, सध्या या प्रकल्पाचा हा तिसरा टप्पा आहे आणि तो अजूनही बाल्यावस्थेतच आहे. या प्रकल्पासमोर अजूनही अनेक सुरक्षा आणि माल पोहचवण्यासंबधित प्रश्न आहेत. तेल अवीव, जाफा, रमत शेरोन, हर्झलिया आणि हडेरामधील शहरी भागात ड्रोन उड्डाणांची चाचणी घेण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. पुढचे 10 दिवस हा प्रयोग चालणार आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पा जूनच्या अखेरीस सुरू झाला होता. या ड्रोन उपक्रमात सहभागी असलेल्या इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीच्या डॅनिला पार्टम यांनी सांगितले, “या वर्षाच्या सुरुवातीला ड्रोनची 700 वेळा उड्डाण चाचणी करण्यात आली होती आणि आता ती संख्या 9,000 पर्यंत वाढली आहे.”

ड्रोन तंत्रज्ञानाच्या बाबतीत इस्रायल अव्वल

इस्रायल ड्रोन तंत्रज्ञानामध्ये जगाचं प्रतिनिधीत्त्व करतो. इस्रायलच्या ड्रोन कंपन्यांचं तंत्रज्ञान हे आतापर्यंतचं सर्वात अव्वल आहे. ड्रोन उपक्रमात सहभागी झालेल्या 16 कंपन्यांपैकी अनेक कंपन्यांचे लष्कराशी संबंध आहेत. पार्टम यांच्या मते, हा उपक्रम 2020 च्या सुरुवातीला कोविड -19 मुळे अधिक क्षमतेने करण्याची गरज भासली, कारण त्यावेळी वैद्यकिय सुविधेचा आभाव होता, सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्यासोबत रुग्णाला तातडीने औषधं आणि वैद्यकीय मदत गरजेची होती, त्या काळात ड्रोन अतिशय उपयोगी ठरले असते. हेच पाहता आता ड्रोन प्रकल्प अधिक वेगाने सुरु आहे. या प्रयोगाचं मूळ हे मानवविरहित सप्लाय चैन तयार करणं आहे.

हेही वाचा:

Greece Earthquake: ग्रीसमध्ये महाकाय भूकंपाचा धक्का, महिनाभरात दुसरा भूकंप, जीवितहानीची माहिती नाही

मॉल, किराणा शॉप्स रिकामे, कुणाला पेट्रोल, कुणाला किराणा मिळेना, ब्रिटनमध्ये सैनिक ट्रक चालवण्याच्या तयारीत