मॉल, किराणा शॉप्स रिकामे, कुणाला पेट्रोल, कुणाला किराणा मिळेना, ब्रिटनमध्ये सैनिक ट्रक चालवण्याच्या तयारीत

Britain Food Crisis : ब्रिटनमधील लोक पॅनिक बाईंग करत आहेत. म्हणजेच, सामान संपण्याच्या भितीने जास्तीची खरेदी सुरु आहे, आणि याच गर्दीमुळे सहापैकी एक ब्रिटिश नागरिकाला गेल्या 15 दिवसांत जीवनावश्यक खाद्यपदार्थ खरेदी करता आलेले नाही.

मॉल, किराणा शॉप्स रिकामे, कुणाला पेट्रोल, कुणाला किराणा मिळेना, ब्रिटनमध्ये सैनिक ट्रक चालवण्याच्या तयारीत
ब्रिटनमध्ये मोकळे पडलेले सुपरमार्केट
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 7:24 PM

लंडन: ब्रिटनमधील परिस्थिती अतिशय भीषण होताना दिसत आहे, मॉल खाली पडले आहेत, किराणा शॉप्समध्ये माल नाही. लोकांना दैनंदिन गरजेच्या गोष्टी मिळणंही अवघड झालं आहे. आणि याला कारण आहे, ब्रिटनची मोडलेली सप्लाय चैन. ब्रिटनमध्ये माल आहे मात्र, त्याचा पुरवठा करणारे ट्रकचालकच नाहीत. त्यामुळे लवकरच ब्रिटिश सैनिकांना हे ट्रक चालवावे लागतील. पुरवठा साखळीचे संकट अजूनही देशात कायम आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने नवीन आकडेवारी जाहीर केली आहे, त्यात असे म्हटले आहे की, ब्रिटनमधील लोक पॅनिक बाईंग करत आहेत. म्हणजेच, सामान संपण्याच्या भितीने जास्तीची खरेदी सुरु आहे, आणि याच गर्दीमुळे सहापैकी एक ब्रिटिश नागरिकाला गेल्या 15 दिवसांत जीवनावश्यक खाद्यपदार्थ खरेदी करता आलेले नाही. द ग्रॉसरने केलेल्या 1,000 ग्राहकांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, फेसिव्ह सिझन सुरु असूनही खाद्यपदार्थांची कमतरता आहे. त्यामुळे दुकानदारही चिंतीत आहेत. (Britain Supply Chain Crisis Millions of shoppers are unable to buy essential Food)

देशाची परिस्थिती इतकी बिघडलेली आहे की, 25 डिसेंबर नाताळ आहे, त्या दिवशीच्या जेवणासाठीचं साहित्य आतापासून लोकांनी भरण्यास सुरुवात केली आहे. हजारो घाबरलेल्या ग्राहकांनी ख्रिसमससाठी त्यांचे वितरण स्लॉट आधीच बुक केले आहेत. 3 पैकी एक खरेदीदार आधीच किराणा मालाचा साठा करू लागला आहे. ब्रिटनला अलीकडच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागलं आहे. यामध्ये गॅसचे वाढते दर आणि ट्रक चालकांची कमतरता यासारख्या समस्यांचा समावेश आहे. यामुळे देशात अराजकता निर्माण झाली आहे. ट्रक चालकांची कमतरता दूर करण्यासाठी ब्रिटनने बाहेरच्या ट्रक चालकांसाठी व्हिसाही जारी केला आहे.

खाद्यपदार्थांचा साठा होऊ देणं थांबवण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांची नियुक्ती

ब्रिटनच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते अन्न टंचाई टाळण्यासाठी ख्रिसमसच्या आधी ट्रक चालवण्यासाठी सैन्य तैनात करण्याचा विचार करत आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी टेस्कोचे माजी बॉस सर डेव लुईस यांची या सप्लाय चैनच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान अशीच पॅनिक बाईंग सुरु राहिली तर, पुढच्या काही महिन्यात 6 पैकी एक व्यक्तीला खाद्यपदार्थ मिळणार नाही.

सर्वेक्षणात धक्कादायक निकाल

दरम्यान, ब्रिटनमध्ये सध्या सुरु असलेल्या खाद्य पदार्थांच्या तुटवड्यावर एक संशोधन करण्यात आलं आहे. या सर्वेक्षण केलेल्यांपैकी एक चतुर्थांश लोकांनी सांगितले की, ते चैनीची खाद्य पदार्थ ते खरेदीच करु शकत नाहीत. 57 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना खरेदी करायच्या असलेल्या वस्तू अजूनही बाजारात खरेदीसाठी उपलब्ध नाहीत. सात पैकी एक जण म्हणतो की. ते पेट्रोल खरेदी करू शकले नाहीत, कारण प्रत्येक पेट्रोल पंपावर नंबर येण्याआधीच इंधन संपलेलं असतं.10 पैकी 6 लोकांनी सांगितले की, त्यांचा खाद्य खरेदीचा अनुभव हा अतिशय भयानक होता. 43 टक्के लोकांनी सांगितले की, स्टोअरमधील वस्तूंमध्ये विविधतेचा अभाव आहे. सर्वेक्षण केलेल्या 14 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी इतर दुकानांमध्ये पायपीट करावी लागत आहे.

हेही वाचा:

हाँगकाँगला लायनरॉक चक्रीवादळ धडकलं, 60 किमीच्या वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पाऊस, महापूराचा इशारा

“सोशल मीडिया हे तर भित्र्यांचं जग, जिथं ते दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद करतात”, ट्रोलिंगवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भडकले!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.