“आम्ही हार्वर्ड-केंब्रिजमध्ये बोलू शकतो, पण भारतात नाही”; राहूल गांधी यांचा लंडनमधून केंद्रावर निशाणा

| Updated on: Mar 06, 2023 | 12:48 AM

भारतासारख्या देशात लोकशाहीला वाचवण्यासाठी ज्या ज्या संस्था अस्तित्वात होत्या त्या संस्था आता भाजपने काबीज केल्या आहेत. यावेळीही त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे.

आम्ही हार्वर्ड-केंब्रिजमध्ये बोलू शकतो, पण भारतात नाही; राहूल गांधी यांचा लंडनमधून केंद्रावर निशाणा
Follow us on

लंडन : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर खासदार राहुल गांधी आता ब्रिटेनच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटेनमध्ये ते भारतीय नागरिकांबरोबर त्यांनी संवाध साधला आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले की, एक भारतीय नेता हार्वर्ड विद्यापीठ आणि केंब्रिज विद्यापीठात भाषण देऊ शकतो, संवाद साधू शकतो पण भारतात तो चर्चा करू शकत नाही असा थेट आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.त्यासाठी भारत सरकारही परवानगी देत ​​नसल्याचे सांगत केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे.

केंब्रिज विद्यापीठातील आपल्या भाषणाबद्दल संवाद साधताना राहुल गांधी यांनी सांगितले की, भारतीय राजकारणावर बोलण्यासाठी मला केंब्रिज विद्यापीठाने आमंत्रित केले होते.

यावेळी त्या विषया मला माझं मत खूप सुंदरपणे मांडता आलं. हे सांगत असताना त्यांनी भारतातील केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, एक भारतीय राजकारणी केंब्रिज आणि हॉर्वर्ड विद्यापीठात चर्चा करू शकतो मात्र भारतात तो काहीही करू शकत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

भारतातील कोणत्याही विद्यापीठात तुम्ही काहीही बोलू शकत नाही. याचे कारण साध आणि सरळ आहे ते म्हणजे भारत सरकार तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही.

यावेळी त्यांनी सांगितले की, विरोधकांना आवाज दडपला जात असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. विरोधकांच्या कोणत्याही मुद्यावर चर्चा होऊ शकत नाही, आणि हे संसदेत घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी भारतातील संसदेमधील अनुभवावर बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यावेळी आम्ही संसदेत नोटाबंदी, जीएसटी, चीनच्या संदर्भात चर्चा करतो, चीनची झालेली घुसखोरीवर बोलतो त्यावेळी आम्हाला सभागृहात बोलण्याची परवानगी नाकारली जाते.हे गंभीर आणि लाजिरवाणे असल्यासारखे आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भारताविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, पूर्वी भारत असा नव्हता, त्या भारताचा आम्हाला प्रचंड अभिमान होता. मात्र आताचा भारत बदलला आहे.

भारतासारख्या देशात लोकशाहीला वाचवण्यासाठी ज्या ज्या संस्था अस्तित्वात होत्या त्या संस्था आता भाजपने काबीज केल्या आहेत. यावेळीही त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे.

आरएसएसमुळे भारताला वाटते की, भारत चीनबरोबर लढू शकत नाही. हेच म्हणण परराष्ट्र मंत्र्यालयाकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.