
सीमा हैदर आणि सचिन यांची अनोखी सीमापार प्रेम स्टोरी तुम्ही वाचली असेलच..आता आणखी एका लग्नाची चर्चा अख्ख्या जम्मू-कश्मीरमध्ये होत आहे. केद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या ( सीआरपीएफ ) जवानाचे एका पाकिस्तानी मुलीशी प्रेम जडले. त्यानंतर या तरुणाने तिच्याशी कोणीही विचार केला नसेल अशा पद्धतीने विवाह केला. त्यानंतर बॉर्डर ओलांडून ही तरुणी पतीच्या घरी म्हणजे सासरी आली. त्यानंतर सर्व गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत….
जम्मू- कश्मीरात एका लग्नाची खूप चर्चा होत आहे. एका सीआरपीएफच्या जवानाने पाकिस्तानी मुलीशी लग्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्याची पत्नी बॉर्डर क्रॉस करुन पतीला भेटायला जम्मूच्या त्याच्या गावी भलवाल येथे पोहचली.या लग्नाची चर्चा साऱ्या गावात होत आहे. कारण मुनीर अहमद सध्या निवासी जिल्ह्यातील शिव खोरीतील सीआरपीएफमध्ये तैनात आहे. तर त्यामुळे सुरक्षा यंत्रणाने तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष्य ठेवायला सुरुवात केली आहे.
जम्मूच्या भलवालचा रहीवासी असलेला सीआरपीएफचा जवान मुनीर अहमद याने पाकिस्तानच्या मनेल खान हीच्याशी निकाह केला आहे. मनेल पाकिस्तानच्या हद्दीतील पंजाब क्षेत्राची रहिवासी आहे. मनेल पाकिस्तानच्या पंजाबातील सियालकोटच्या गुजरांवालाच्या कोटली फकीर चंद यांच्या मोहम्मद असगर खान यांची मुलगी आहे. या जोडप्याने गेल्यावर्षी २४ मे रोजी निकाह केलाय, व्हीसा न मिळाल्याने निकाहला उशीर झाल्याने या जोडप्याने अनोख्या पद्धतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने निकाह केला होता.
आता अधिकृतपणे लग्न केल्यानंतर पाकिस्तानी तरुणी मनेल भारताच्या मुनीरची पत्नी बनली आहे. लग्नानंतर जेव्हा तिला १५ दिवसांचा व्हीसा मिळाला तेव्हा अटारी-वाघा बॉर्डरच्या मार्गाने आपल्या पतीला भेटण्यासाठी जम्मूला पोहचली. रात्री उशीरा जसी मनेल बॉर्डर पार करुन भारतात पोहचली तेव्हा पलीकडे भारताच्या सीमेवर तिचे सासरची मंडळी तिची वाट पाहात उभी होती. बॉर्डरवरच नव्या सुनेचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि तिला सासरी आणण्यात आले. गावात जशी ही बातमी जशी गावात पोहचली तशी पाकिस्तानी सूनेला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली.