
देशाची राजधानी दिल्लीत काल लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाला. धीम्या गतीने जाणाऱ्या i20 कारमध्ये हा ब्लास्ट झाला. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 जखमी आहेत. गर्दीच्यावेळी हा स्फोट झाल्याने जिवीतहानी जास्त झाली. आसपासची अनेक वाहनं जळून खाक झाली. अनेक गाड्यांच्या कारच्या काचा तुटल्या. स्फोटात जखमी झालेल्यांवर लोक नायक जय प्रकाश रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी सुद्धा या स्फोटाचं मोठ्या प्रमाणात कव्हरेज केलय. कारण हल्ल्याच्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याची चर्चा आहे. ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना आहे.
‘भारतात नवी दिल्ली लाल किल्ल्याजवळ स्फोट, कमीत कमी आठ ठार’ असं प्रमुख पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनने म्हटलय. स्थानिक मीडियाने हेडलाइनसह ही बातमी छापलीय. डॉनने लिहिलय की, “स्थानिक टेलिविजन चॅनलच्या रिपोर्टनुसार, सोमवारी भारताची राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला. यात कमीत कमी 8 लोक मारले गेले. कमीत कमी 20 जखमी आहेत”
जिओ न्यूजने काय म्हटलय?
‘दिल्ली कार स्फोटाची दहशतवाद विरोधी कायद्यातंर्गत सुरु आहे चौकशी’ असं जिओ न्यूजने म्हटलय. यात लिहिलय की, “भारतीय पोलीस, दहशतवादाशी लढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कठोर कायद्याच्या आधारे दिल्लीत झालेल्या घातक स्फोटाची चौकशी करत आहेत” UAPA हा भारतातील प्रमुख दहशतवादविरोधी कायदा आहे. या कायद्याचा वापर दहशतवादाशी संबंधित कृत्य, संप्रभुता आणि अखंडतेला धोका पोहोचवणाऱ्या घडामोडींची चौकशी आणि खटला चालवण्यासाठी केला जातो.
द एक्सप्रेस ट्रिब्यूनने काय म्हटलं?
‘भारताच्या राजधानीत कार स्फोट झाला. त्यात कमीत कमी आठ लोकांचा मृत्यू झाला’ अशी हेडलाइन द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिली होती. ‘सोमवारी भारताच्या राजधानीत झालेल्या स्फोटात 8 लोकांचा मृत्यू झाला. 19 जखमी झाले’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याच वृत्तात म्हटलं आहे. पोलिसांनी कारणांबद्दल सांगितलेलं नाही. फोरेन्सिक आणि दहशतवाद विरोधी यंत्रणा ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ आहेत असं पाकिस्तानी वृत्तात म्हटलं आहे.
पाकिस्तान टुडेची बातमी काय?
भारतात लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात कमीत कमी 8 लोकांचा मृत्यू झालाय असं पाकिस्तान टुडेने आपल्या हेडलाइनमध्ये म्हटलं आहे. लाल किल्ल्याजवळच्या स्फोटात कमीत कमी 8 लोकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी तपास सुरु केलाय असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.