AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Blast Update : रिसिन विष, महिला डॉक्टरकडे रायफल, एकाच हॉस्पिटलमधले चार डॉक्टर्स,दिल्ली स्फोटाशी त्यांचं काय कनेक्शन

Delhi Blast Update : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होतं आहेत. एका हॉस्पिटलमधील चार डॉक्टर्सची नाव समोर आली आहेत. हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे. तपास जसा पुढे सरकेल, त्यातून अजून धक्कादायक खुलासे होऊ शकतात.

Delhi Blast Update : रिसिन विष, महिला डॉक्टरकडे रायफल, एकाच हॉस्पिटलमधले चार डॉक्टर्स,दिल्ली स्फोटाशी त्यांचं काय कनेक्शन
Dr umar,Muzzammil , Adeel
| Updated on: Nov 11, 2025 | 12:42 PM
Share

दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटाने दिल्ली हादरली. संध्याकाळी 6:52 मिनिटांनी शक्तीशाली स्फोट झाला. यात 9 जणांचा मृत्यू झाला. 20 जखमी आहेत. स्फोट इतका शक्तीशाली होता की, आसपासचा परिसर हादरला. परिसरात एकच गडबड, गोंधळाची स्थिती होती. i20 कारमध्ये हा स्फोट झाल्याचं तपासातून समोर आलय. घटनेच्या 3 तास आधी ही कार सुनहरी मशि‍दीजवळ उभी होती. स्फोटानंतर तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. त्यावरुन हा स्फोट आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत.

स्फोटाच्या आधी सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी एक जॉइंट ऑपरेशन केलं. त्यांनी दोन वेगवेगळ्या घरातून 2,900 किलो IED बनवणारे केमिकल्स, शस्त्र आणि दारु गोळा जप्त केला. जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अंसर गजवात-उल-हिंद (AGuH) यांच्याशी संबंधित आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा पदार्फाश करताना ही सामग्री हाताला लागली. ही कारवाई आणि स्फोटाची वेळ याचा परस्परांशी किती संबंध आहे, त्या दृष्टीने तपास सुरु आहे. या दहशतवादी हल्ल्याचं डॉक्टर्स कनेक्शन समोर येतय.

डॉ. आदिल अहमद राठर

दिल्लीत स्फोट होण्याआधी काही घटना घडल्या. अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉ. आदिल अहमद राठरला अटक केली. तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. त्याच्या लॉकरमध्ये पोलिसांना AK-47 रायफल सापडली. राठरचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंदशी आहे.

महिला डॉक्टर

दुसरी अटक 7 नोव्हेंबरला हरियाणाच्या फरीदाबादमध्ये झाली. अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये कार्यरत असलेली लखनऊची एक महिला डॉक्टर शाहीन शाहिदच्या कारमध्ये ‘कॅरोम कॉक’ नावाची असॉल्ट रायफल सापडली. तिचा या नेटवर्कमध्ये काय रोल आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या तिची ओळख पोलिसांनी सार्वजनिक केलेली नाही.

तिसऱ्या डॉक्टरचं शिक्षण चीनमध्ये

7 नोव्हेंबरला गुजरात एटीएसने अहमद मोहियुद्दीन सैयद नावाच्या डॉक्टरला पकडलं. हा डॉक्टर हैदराबादचा राहणारा आहे. चीनमध्ये त्याने शिक्षण घेतलय. चौकशीत समोर आलय की, रिसिन नावाचं एक खतरनाक विष तो बनवत होता. त्याने दिल्ली आजादपुर मंडी, अहमदाबादचं नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊच्या आरएसएस कार्यालय सारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती.

चौथ्या डॉक्टरकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट

या ऑपरेशनमध्ये चौथी अटक 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून झाली. डॉ. मुझमिल शकील नावाच्या कश्मिरी डॉक्टरला अटक झाली. तो अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये शिकवत होता. त्याच्याकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. बॉम्ब बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. मुझमिलच्या दुसऱ्या ठिकाणावर छापा मारला, तिथून 2563 किलो स्फोटकं सापडली. शकीलचा संबंध जैश सारख्या प्रतिबंधित संघटनेशी आहे असं फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.