Delhi Blast Case Update : दिल्ली बॉम्बस्फोटात नाव आलेला डॉक्टर उमर नबी कोण? त्याचं काश्मीरशी काय कनेक्शन?
Delhi Blast Case Update : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळताना दिसतय. यात एका डॉक्टरचा हात असल्याचं समोर आलय. हा डॉक्टर उमर नबी कोण? त्याचं काश्मीरशी काय कनेक्शन? सर्व डिटेल जाणून घ्या. या स्फोटात 9 निरपराधांनी आपले प्राण गमावले आहेत.

दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या स्फोटामध्ये फरीदाबाद येथील डॉक्टर उमर नबीच नाव समोर येत आहे. सीएनएन न्यूज 18 ने सूत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. स्फोट झाला त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यावरुन उमर नबी यामध्ये सहभागी असल्याचं दिसतय. घटनास्थळी एक तुटलेला हात सापडला, तो डॉ. उमरचा असल्याची शक्यता आहे. तो डॉक्टर उमरच आहे, याची ओळख पटवण्यासाठी काश्मीरमधील त्याच्या कुटुंबाचे DNA नमुने घेण्यात आले आहेत. निळ्या रंगाच्या शर्टमधील माणसाचा जो फोटो दिसतोय, तो डॉ. उमरच आहे.
डॉ. उमर यू नबी हा जीएच नबी भट यांचा मुलगा आहे. डॉ. उमर अल फलाह मेडीकल कॉलेज फरीबाद येथे नोकरीला होता. डॉ. उमरची आई शमीमा बानू, पुलवामा कोइलची आहे. 24 फेब्रुवारी 1989 रोजी डॉ. उमरचा जन्म झाला.तो डॉ. अदीलच्या खूप जवळ होता. डॉ. अदीलचा सुद्धा तपास सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उमरचे वडील सरकारी शिक्षक होते. मानसिक दृष्टया स्थिर नसल्यामुळे 10 ते 15 वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली. त्याला दोन भाऊ आणि एक बहिण आहे. एका भावाचं आणि बहिणीचं लग्न झालय. एक भाऊ अविवाहित आहे. दोन्ही भाऊ आणि आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला
टेलिग्राम चॅनलद्वारे कट्टरतावादाकडे झुकलेल्या मेडीकल प्रोफेशनल्स ग्रुपचा डॉ. उमर एक भाग बनलेला असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. फरीदाबाद मॉड्युल म्हणून याकडे पाहिलं जात आहे. डॉ. उमरच्या सहभागाचे ठोस पुरावे हाती लागल्यास तपासातील हे एक मोठं यश असेल.ह्युनडाय i20 सोमवारी संध्याकाळी दिल्ली लाल किल्ला परिसरातून जात असताना हा शक्तीशाली स्फोट झाला. गर्दीच्यावेळी हा ब्लास्ट झाला. या स्फोटात अनेक गाड्याचं नुकसान झालय. नऊ जण ठार झाले असून 20 जण जखमी आहेत. हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याचं सूत्र सांगतं आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलीस हल्लेखोराची ओळख पटवत आहेत.
