
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवा गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर जोरात पसरल्या होत्या. काहींनी दावा केला की, इराणच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अफवांना प्रत्युत्तर देण्यासाठी नेतन्याहूंच्या अधिकृत X अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओत ते एका कॅफेमध्ये कॉफी पीताना दिसतात आणि अफवांवर हसत-खेळत प्रतिक्रिया देतात.
पण आता या व्हिडीओनेच नवीन वाद निर्माण केला आहे. एलन मस्क यांच्या xAI कंपनीने विकसित केलेल्या Grok AI ने या व्हिडीओला डीपफेक (नकली) असल्याचे सांगितले आहे. यामुळे लोकांच्या गोंधळात आणखी भर पडली आहे.
प्रकरण कसे सुरू झाले?
सुरुवातीला एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात नेतन्याहूंच्या हातात सहा बोटे दिसत असल्याचा दावा करण्यात आला. यावरून लोकांनी असा अंदाज लावला की, हा व्हिडीओ AI ने तयार केलेला असावा किंवा त्यांच्या जागी ‘डिजिटल डबल’ किंवा ‘बॉडी डबल’ वापरण्यात आला असावा. नेतन्याहू गेल्या काही दिवसांत लाईव्ह दिसले नव्हते, त्यामुळे मृत्यूच्या अफवा अधिक जोर धरु लागल्या आहेत. या अफवांना खोडून काढण्यासाठी रविवारी त्यांच्या X अकाउंटवरून नवा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. व्हिडीओत ते कॅफेत उभे राहून कॉफी पीताना आणि “लोक म्हणतात मी मेलोय? पण मी इथे कॉफी पीत आहे,” असे हसत म्हणताना दिसतात.
Hey @grok is it real?
— Meena Jan (@meenajanbetani) March 15, 2026
Grok AI चा दावा काय?
जेव्हा एका युजरने Grok AI ला विचारले की, हा व्हिडीओ खरा आहे का? तर Grok ने उत्तर दिले: “नाही, हा व्हिडीओ खरा नाही. हा AI ने तयार केलेला डीपफेक व्हिडीओ आहे. नेतन्याहूंच्या अधिकृत अकाउंटने मृत्यूच्या अफवांना प्रत्युत्तर म्हणून हा व्हिडीओ हास्य-विनोदाच्या रूपात पोस्ट केला आहे. स्टॅटिक कॉफी लेव्हल, अननॅचरल लिप सिंक आणि बॅकग्राउंडमधील काही अस्वाभाविक गोष्टी यासारखी चिन्हे डीपफेक असल्याचे दर्शवतात.”
कॅफेकडून पुरावा
या वादामध्ये कॅफेनेही प्रतिक्रिया दिली आहे. कॅफेने फोटो प्रसिद्ध केले आहेत ज्यात नेतन्याहू स्वतः तिथे उपस्थित होते, असे दाखवण्यात आले आहे. यामुळे काही लोक अजूनही हा व्हिडीओ खरा असल्याचे सांगत आहेत.