डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अंगाची आग, भारताबद्दल पुन्हा धक्कादायक विधान, म्हणाले, लज्जास्पद…

चीन, भारत आणि रशिया जवळ आल्याने डोनाल्ड ट्रम्प सरकार हे भडकावू विधाने करताना दिसत आहे. आता थेट डोनाल्ड ट्रम्प सरकारने भारताबद्दल मोठे विधान केले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही भाष्य केले. चीनमधून पुतिन आणि नरेंद्र मोदी यांचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अंगाची आग, भारताबद्दल पुन्हा धक्कादायक विधान, म्हणाले, लज्जास्पद...
Donald Trump
| Updated on: Sep 02, 2025 | 8:56 AM

भारत आणि अमेरिकेतील टॅरिफचा मुद्दा ताणला गेलाय. यादरम्यान चीन हा भारताच्या अधिक जवळ येताना दिसतोय. चीनमधील तियानजिन येथे झालेल्या एससीओ शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेली भेट अमेरिकी सरकारचा जळफळाट उठलाय. हेच नाही तर बैठकीला नरेंद्र मोदी आणि पुतिन हे एकाच गाडीत गेले. पुतिन हे नरेंद्र मोदी यांची वाट पाहत काही वेळ गाडीत बसले होते. यादरम्यानचा फोटोही मोदींनी सोशल मीडियावर शेअर केला. आता यावर अमेरिकेतून प्रतिक्रिया आली असून त्यांची तणतण सुरू झाल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. मोदी आणि पुतिन यांनी या फोटोच्या माध्यमातून जगाला मोठा संदेश दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा नवी दिल्लीवर संताप व्यक्त केला आहे. चीनमधील नरेंद्र मोदी आणि पुतिन यांचा फोटो पाहून त्यांचा भडका उडाला आहे. यावेळी नवारो यांनी चीनसोबत भारताच्या संबंधांवर थेट भाष्य केले आहे. पीटर नवारो यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान आणि मोठे नेते आहेत. मोदी हे पुतिन आणि जिनपिंग सारख्या हुकूमशहांच्या जवळ का येत आहेत हे मला मुळीत समजत नाहीये.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते असलेले मोदी यांच्यासाठी हे लज्जास्पद आहे. मोदी हे जगातील सर्वात मोठा हुकूमशहा पुतिन आणि जिनपिंग यांच्यासोबत जात आहेत. याचे दु:ख आहे. पण याचा काहीच अर्थ नाही. एससीओ शिखर संमेलनात तिन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर नवारो यांनी हे विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि शी जिनपिंग यांचे काही फोटो व्हायरल झाली आहेत. यामध्ये तिघेही हसताना आणि मित्रांसारखे वागताना दिसत आहेत.

अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर या भेटीला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले होते. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी थेट भाष्य केले आहे. नवारो यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झाले की, नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर जाणे आणि पुतिन हे देखील तिथे येणे त्यांना अजिबातच पटले नाहीये. चीन आणि भारताने काही महत्वाचे करार देखील केले आहेत.