AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने भारतासमोर पसरवले हात, अर्थमंत्र्यांचे थेट मोठे विधान, म्हणाले, चीन आणि रशियापेक्षा आम्ही दोघे…

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले आहेत. टॅरिफचा वाद टोकाला पोहोचला असून अमेरिकेकडून भारताबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत. हेच नाही तर भारत देखील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे बघायला मिळतंय.

अमेरिकेने भारतासमोर पसरवले हात, अर्थमंत्र्यांचे थेट मोठे विधान, म्हणाले, चीन आणि रशियापेक्षा आम्ही दोघे...
Donald Trump
| Updated on: Sep 02, 2025 | 8:12 AM
Share

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट बेसेंट यांनी भारतासोबतच्या सध्याच्या तणावामध्ये मोठे भाष्य केले आहे. काही दिवसांपासून अमेरिकेकडून भारताबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यामध्येच आता अमेरिका एक पाऊल मागे भूमिका घेताना दिसत आहे. हेच नाही तर सध्याच्या व्यापार तणावात अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले की, दोन्ही महान देश आहेत आणि समाधान काढतील. अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी भारताबद्दल केलेल्या विधानाने जगाच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण अमेरिकेकडून भारताबद्दल कधी टीका तर कधी काैतुक केले जात आहे.

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप जास्त मजबूत आहेत. मनापासून वाटते की, शेवटी आम्ही एकत्र येऊ. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले संबंध आहेत. हा विषय फक्त रशियाच्या तेलाचा नाहीये. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकतंत्र देश आहे आणि अमेरिका ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था. मला वाटते की, शेवटी आम्ही एकत्र येणार आहोत.

यासोबतच चीनमधील संमेलनाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, मला वाटते की, हे संमेलन पूर्वनियोजित होते. मात्र, बऱ्याच गोष्टी तिथे फक्त दाखवण्यासाठी केल्या जातात. भारत हा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे आणि मला वाटते की, रशिया, चीन यांच्या तुलनेत भारत हा आमच्या अधिक जवळचा आहे. मात्र, त्यांनी रशियाच्या तेलाबद्दल बोलताना म्हटले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करतोय आणि त्याला विकतोय मला असे वाटते की, हा व्यवहार त्यांचा चांगला नाहीये.

अर्थमंत्री स्कॉट बेसेंट हे भारताचे थेट काैतुक करताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार भारतावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अनेक देश हे भारताच्या मदतीला धावून आले. हेच नाही तर रशियाने हे देखील स्पष्ट केले की, भारतीय वस्तूंचे आम्ही आमच्या देशात मोठ्या प्रमाणात स्वागत करू.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.