AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस वितरणासाठी सरकारचे 3 मोठे निर्णय, आता तुटवडा भासणार नाही; काय काय उपायोजना?

गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई करण्याचा आदेश देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. सोबतच राज्यात पेट्रोल, डिझेलचा भाव वाढलेला नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे.

गॅस वितरणासाठी सरकारचे 3 मोठे निर्णय, आता तुटवडा भासणार नाही; काय काय उपायोजना?
CHHAGAN BHUJBALImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2026 | 4:21 PM
Share

LPG Gas Cylinder : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येक शहरात लोक एलपीजी गॅस सिलिंडर मिळावा यासाठी रांग लाऊन उभे आहेत. गॅस बुकिंग करूनही लोकांना वेळेवर गॅस मिळत नाही. असे असतानाच आता लोकांना गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे राज्यात कुठेही हा तुटवडा निर्माण होणार नाही, असा दावा सरकारकडून केला जातोय. गरज भासलीच तर आम्ही राज्यात केरोसीनच्या वितरणाचाही पर्याय तपासून पाहू, असेही अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ नाही

सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरच छगन भुजबळ यांनी सरकारने आतापर्यंत काय-काय केलेले आहे, याची सविस्तर माहिती दिली.  त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील गॅस पुरवठा सुरळीत व्हावा हा प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

पहिला निर्णय- खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

एपीजी गॅसच्या पुरवठ्यासाठी तसेच कालाबाजार रोखण्यासाठी सरकारने पथकं नेमली आहेत. कुठेही काळाबाजार आढळ्यास कटोर कारवाई केली जाणार आहे.  केंद्र सरकारने शिल्लक गॅसचे वाटप करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले. सामाजिक माध्यमांवर खोट्या बातम्या देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.  आवश्यकतेनुसार केरोसीन वितरण करण्याची बाब विचाराधीन आहे, अशीही महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

दुसरा निर्णय- कोळसा, रॉकेलचा वापर केला जाईल

जिल्ह्यात केरोसीनची वाहतूक, साठवणूक आणि वितरण व्यवस्था कशी करता येईल याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आली आहे केरोसीन पुन्हा वाटप केले जाईल. सध्या केरोसीनचा भाव 61 रुपये लिटर आहे.  एलपीजीला पर्याय म्हणून कोळसा आणि रॉकेल यांचाही वापर केला जाईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

तिसरा निर्णय- कोणाला किती गॅस पुरवठा होणार?

रुग्णालये, स्मशानभूमी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि शैक्षणिक संस्था यांना 100 टक्के गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. संरक्षण, शासकीय, हवाई वाहतुकीला 70 टक्के गॅस पुरवठा केला जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल