AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! टॅरिफवरून तणाव, 450 हून अधिक भारतीय सैनिक थेट अमेरिकेत दाखल, डोनाल्ड ट्रम्प यांनी परत…

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला. हेच नाही तर रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी भारतावर मोठा दबाव हा अमेरिकेकडून टाकला जात आहे.

मोठी बातमी! टॅरिफवरून तणाव, 450 हून अधिक भारतीय सैनिक थेट अमेरिकेत दाखल, डोनाल्ड ट्रम्प यांनी परत...
Donald Trump
| Updated on: Sep 02, 2025 | 7:40 AM
Share

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला असल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. हेच नाही तर अमेरिकेच्या टॅरिफच्या विरोधात भारताकडून विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान आणि त्यानंतर चीनच्या दाैऱ्यावर गेले. चीनमध्ये ते पुतिन यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करताना देखील दिसले. मात्र, टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील मागील काही वर्षांचे चांगलेच संबंध बिघडले आहेत. मात्र, काल दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून ते भारताबद्दलच्या मैत्रीबद्दल बोलताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला मोठी धमकी दिलीये.

टॅरिफच्या मुद्द्यावरून संबंध बिघडलेले असतानाच आता भारत आणि अमेरिकेतील संरक्षण सहकार्याचे संबंध अजूनही मजबूत आहेत, हे दिसत आहे. दोन्ही देशांनी सोमवारी अलास्कामध्ये युद्ध अभ्यास सुरू केला आहे. हा सराव अलास्कातील फोर्ट वेनराईट येथे होतोय. मद्रास रेजिमेंटचे 450 हून अधिक भारतीय सैनिक 14 सप्टेंबरपर्यंत अमेरिकन सैन्याच्या 11 व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या आर्क्टिक वुल्व्हज ब्रिगेड कॉम्बॅट टीमच्या 5 व्या इन्फंट्री रेजिमेंट बॉबकॅट्ससोबत युद्धाभ्यास करतील.

टॅरिफच्या मुद्द्यानंतर आता भारताचे तब्बल 450 हून अधिक सैनिक हे थेट अलास्कामध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस चीनच्या दाैऱ्यावर होते. भारत आणि अमेरिकेच्या सैन्यामध्ये युद्धाअभ्यास सुरू असल्याची माहिती भारतीय विदेश मंत्रालयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिलीये. हेच नाही तर भारतीय सैन्य अलास्कामध्ये पोहोचल्यानंतरचा एक फोटोही शेअर करण्यात आल आहे.

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताविरोधात भडकावू विधाने अमेरिकेकडून केली जात आहेत. त्यामध्येच आता मैत्रीच्या दिशेने पाऊल टाकताना अमेरिका परत दिसत आहे. मात्र, अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारतातील अनेक उद्योगांवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. सी फूडचे मोठे नुकसान होताना दिसतंय. यासोबत भारत आणि अमेरिकेतील पोस्ट सेवा देखील वाढलेल्या करामुळे बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. आका आपल्याला पोस्टाच्या माध्यमातून कोणतीही कागदपत्रे वगैरे अमेरिकेत पाठवता येणार नाहीत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा