Donald Trump : काही तरी मोठं घडणार! डोनाल्ड ट्रम्प यांची इराणच्या विरोधात धडकी भरवणारी घोषणा, संपूर्ण जगात खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणच्या विरोधात मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

Donald Trump : काही तरी मोठं घडणार! डोनाल्ड ट्रम्प यांची इराणच्या विरोधात धडकी भरवणारी घोषणा, संपूर्ण जगात खळबळ
donald trump
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 9:16 AM

इराणने अमेरिकेसाठी होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरोधात मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडियावर ट्रम्प यांनी होर्मुजच्या सामुद्रधुनीचं नाव थेट ‘ट्रम्प स्ट्रेट’ असं नामकरण केलं आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत होर्मुजचं नाव बदलण्याचे संकेत दिले आहेत. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेने अमेरिका-इराणमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर इराण आणि होर्मुजचा नकाशा शेअर केला. या नकाशात त्यांनी होर्मुज स्ट्रेटचं नामकरण हे ‘ट्रम्प स्ट्रेट’ असं केलं आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टने इराणचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. इराणने काही दिवसांपूर्वीच अमेरिकेसाठी होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु ट्रम्प यांच्या नव्या भूमिकेने दोन्ही देशातील नागरिकांचही टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी नुकतंच म्हटलं होतं की, इराणने ट्रम्प सरकारसमोर एक प्रस्ताव मांडला. होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे आणि युद्ध संपवण्यासाठी सात दिवसांत चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु दोन्ही देशातील तणाव अद्याप कमी होताना दिसत नाही. ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, इराणच्या प्रशासनाला कोणत्याही स्थितीत अण्वस्त्रे तयार करू देणार नाही. अमेरिकेने यावरून इराणवर हल्ला देखील केला होता. या युद्धात दोन्ही देशांचं भयंकर नुकसान झालं आहे. त्यानंतरही दोन्ही देशातील तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे.

तत्पूर्वी, इराण अण्वस्त्रे विकसित करू शकणार नाही, यासाठी अमेरिका आक्रमक झाला आहे. त्यासाठी नवी सिस्टीम उभारत आहे. दुसरीकडे इराणच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अणुकार्यक्रम राबवण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. परंतु अमेरिका इराणची मागणी मान्य करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दोन्ही देशात तोडगा निघाल्यावर जगात शांतता निर्माण होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us