तिसरं महायुद्ध पेटणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांच्यावर गंभीर आरोप, रशियाच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष

USA vs Russia : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी रशियावर गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे तिसऱ्या महायुद्धाला सुरूवात होऊ शकते. त्यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.

तिसरं महायुद्ध पेटणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांच्यावर गंभीर आरोप, रशियाच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष
Trump vs Putin
Image Credit source: Google
| Updated on: Mar 13, 2026 | 10:57 PM

अमेरिका आणि इराण यांच्यात भीषण युद्ध शुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी रशियावर गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे तिसऱ्या महायुद्धाला सुरूवात होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांना असा संशय आहे की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षात इराणची मदत करत असावेत. ट्रम्प यांनी हे विधान फॉक्स न्यूज रेडिओला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. मुलाखतीदरम्यान ट्रम्प म्हणाले, ‘मला वाटते की पुतीन कदाचित त्यांना थोडीफार मदत करत असतील. हो, माझा असा अंदाज आहे.’ यावर अद्याप रशियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ट्रम्प यांचा रशियावर गंभीर आरोप

या मुलाखतीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर रशिया इराणला समर्थन देत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी म्हटले की, ‘मला वाटते की ते कदाचित थोडी मदत करत असतील. आणि कदाचित त्यांना असेही वाटत असेल की अमेरिका युक्रेनची मदत करत आहे.’ ट्रम्प यांनी पुढे बोलताना सांगितलं की, ‘आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेकदा देश आपल्या सहयोगी देशांना मदत करत असतात. आपण युक्रेनला मदत करत आहोत. त्यामुळे तेही तसे करू शकतात.’

गुप्तचर सहकार्य केल्याबाबत माहिती

काही अमेरिकन मीडिया अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रशिया इराणला अमेरिकन लष्करी तळांबाबतची गुप्त माहिती देत आहे. या अहवालांनुसार ही माहिती अमेरिकन सैनिक, जहाजे आणि विमाने यांच्या स्थान आणि हालचालींशी संबंधित असू शकते. त्यामुळे इराणला हल्ल्यांची योजना तयार करण्यात मदत होऊ शकते, असे सांगितले जात आहे. मात्र यात किती सत्यता आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

अमेरिकेची भूमिका काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी पुतीन इराणला मदत करत असल्याचा दावा करत असते तरी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी गेल्या आठवड्यात माध्यमांशी बोलताना सांगितले की होते की, सध्याच्या संघर्षात रशिया आणि चीन हे सध्या मोठे घटक नाहीत.

दरम्यान, जागतिक विश्लेषकांचे मत आहे की, जर रशिया प्रत्यक्षात इराणची मदत करत असेल, तर हा संघर्ष केवळ मध्य-पूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो जगभर पसरू शकतो. यामुळे महायु्द्धालाही सुरुवात होऊ शकते. कारण सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण एका नव्या वळणावर पोहोचले आहे, त्यामुळे बड्या देशांच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

 

Follow Us