Us Envoy Sergio Gor : अमेरिका-भारताचं भांडण मिटल्याचे संकेत देणारी सर्वात मोठी बातमी

Us Envoy Sergio Gor : भारतातील नवनियुक्त अमेरिकी राजदूत सर्जियो गोर यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं आहे. भारत-अमेरिका वाद आता जास्त दिवस चालणार नाही हेच त्यातून स्पष्ट होतय. सर्जियो गोर यांनी काय म्हटलय?

Us Envoy Sergio Gor : अमेरिका-भारताचं भांडण मिटल्याचे संकेत देणारी सर्वात मोठी बातमी
Modi-Trump
| Updated on: Jan 12, 2026 | 3:03 PM

भारतातील नवनियुक्त अमेरिकी राजदूत सर्जियो गोर यांनी दिल्लीत पदभार स्वीकारल्यानंतर द्विपक्षीय संबंधांना नवीन दिशा देणारं स्टेटमेंट केलं आहे. राजदूत गोर म्हणाले की, “ट्रम्प लवकरच भारतात येऊ शकतात. अमेरिका-भारत संबंध फक्त परस्पर हितांवर आधारित नाहीत. हे संबंध सर्वोच्च स्तरावर आधारलेले आहेत. खऱ्या मित्रांमध्ये आपसात असहमती होत असते. पण ते आपले मतभेद सोडवतात” सर्जियो गोर यांनी भारतीयांची क्षमता, अध्यात्मिकता यांचं कौतुक केलं. संपूर्ण भारत भ्रमंतीची इच्छा व्यक्त केली. भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबद्दल पुढची चर्चा उद्या होईल, असं त म्हणाले. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा संदेश देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांचे खास मित्र असा उल्लेख केला. ट्रम्प भारतात येऊ शकतात हेच अमेरिका-भारताचं भांडण मिटल्याचे संकेत आहेत.

भारत पुढच्या महिन्यात ‘पॉक्स सिलिका’ (PaxSilica) या अमेरिकेच्या उपक्रमात पूर्ण सदस्य म्हणून सहभागी होणार असल्याची सर्जियो यांनी घोषणा केली. ‘पॉक्स सिलिका’ हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक रणनितीक उपक्रम आहे. खनिज पदार्थ, सेमीकंडक्टर, एआय विकास आणि अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक सुरक्षित सिलिकॉन सप्लाई चेन बनवणं हा त्यामागे उद्देश आहे. सर्जियो गोर म्हणाले की, “दोन्ही देशांमध्ये व्यापाराशिवाय सुरक्षा, दहशतवाद विरोध, ऊर्जा आणि आरोग्य अशा सेक्टर्समध्ये सुद्धा सहकार्य सुरु राहिलं”

या प्रोजेक्टमध्ये सोबत राहणं अनिवार्य

राजदू़त सर्जियो गोर यांनी पॉक्स सिलिकाला (PaxSilica) एक जागतिक इनोवेशन-ड्रिवन सप्लाय चेन म्हटलं. महत्वाची खनिजं, ऊर्जा इनपुट, सेमीकंडक्टर्स आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित ही चेन आहे. मागच्या महिन्यात जापान, दक्षिण कोरिया, यूनायटेड किंगडम आणि इस्रायल हे देश त्यामध्ये आहेत. आता पुढच्या महिन्यात भारताला पूर्ण सदस्य म्हणून बोलवण्यात आलं आहे. गोर यांच्यानुसार, नवीन टेक्निक स्वीकारण्यासह भारत आणि अमेरिकेला मिळून काम करणं अनिवार्य असेल.

अजून गोर काय म्हणाले?

बऱ्याच महिन्यांपासून चर्चा सुरु असलेल्या ट्रेड डीलवर अपडेट देताना सर्जियो गोर म्हणाले की, ‘दोन्ही पक्ष सक्रीय रित्या जोडलेले आहेत. उद्या यावर महत्वाचा कॉल होईल’ सर्जियो गोर म्हणाले की, मी राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी बोललो होतो. त्यांनी ट्रम्प आणि पीएम मोदी यांच्या मैत्रीचा उल्लेख केला. 2013 नंतर मी पहिल्यांदा भारत भेटीवर आल्याचं गोर म्हणाले. ट्रम्प राष्ट्रपती बनल्यानंतर मी हजारो संघीय नियुक्त्यांची जबाबदारी संभाळली होती असं गोर म्हणाले.