Donald trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली शेवटची वार्निंग; संपूर्ण जगाची धडधड वाढली

donald trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटची वार्निंग दिली आहे. ट्रम्प यांच्या वार्निंगने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

Donald trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली शेवटची वार्निंग; संपूर्ण जगाची धडधड वाढली
| Updated on: Aug 04, 2026 | 10:51 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटची वार्निंग दिली आहे. ट्रम्प यांनी तेहरानला टार्गेट करत दोन पर्याय दिले आहेत. तडजोड करा किंवा शरणागती पत्करा, असे दोन पर्याय दिले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांनी इराणवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोठा इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्र्थ सोशल’वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं की, इराणने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इराणने अणू प्रकल्पाविषयी भूमिका स्पष्ट करावी. तोडगा काढण्याचा मार्ग अद्याप खुला आहे. परंतु त्यासाठी तेहरानने ठोस पावले उचलली पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.

इराणवर दुटप्पीपणाचा आरोप करत म्हटलं की, तेहरान सार्वजनिकरित्या अमेरिकेशी संवाद साधण्यास नकार देत आहे. दुसरीकडे पडद्याआड चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. खरंतर इराणनेच वाटाघाटीसाठी प्रयत्न सुरू केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ‘इराणने या गोष्टी स्वीकार केल्या अथवा नाकारल्या. तरी दोन्ही देशांमध्ये वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा वाद अनेक दशकांपासून आहे. या सर्व वाद इराणच्या धोरणांमुळे होत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी इराणच्या होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील दाव्यावरूनही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता या समुद्री मार्गावर अमेरिकेच्या नौसेनेची देखील उपस्थिती होईल. या मार्गाचं नियंत्रण इराणकडे नाही. या मार्गावरून समुद्री वाहतुकीवर अमेरिकेची करडी नजर राहणार आहे.

‘इराण करार करण्यावर सहमत तयार नसेल किंना शरणागती पत्करण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत अमेरिका रणनीती बदलणार नाही. आता इराणपर्यंयत काय पोहोचेल आणि काय नाही, याविषयाचा निर्णय देखील अमेरिकेच्या धोरणावर अवलंबून असणार आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटलं. ट्रम्प यांच्या इशाऱ्याने संपूर्ण जगाची धडधड वाढली आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराण काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us