जगाच्या तोंडचे पाणी पळवून अमेरिका 300 अब्ज डॉलर्सचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना उभारणार, अत्यंत मोठी घोषणा, थेट भारत..

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा मोठा फटका अनेक देशांना बसला आहे. गॅसचा जवळपास मोठा तुटवडा सगळीकडे निर्माण झाला. त्यामध्येच आता अमेरिकेकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

जगाच्या तोंडचे पाणी पळवून अमेरिका 300 अब्ज डॉलर्सचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना उभारणार, अत्यंत मोठी घोषणा, थेट भारत..
Donald Trump billion oil refinery
| Updated on: Mar 11, 2026 | 10:31 AM

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासातील सर्वात मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे 300 अब्ज डॉलर्स म्हणजेच 25 लाख कोटी रूपयांचा एक नवीन तेल शुद्धीकरण रिफायनरी बांधली जाईल. गेल्या 50 वर्षातील अमेरिकेतील हा पहिला नवीन तेल शुद्धीकरण कारखाना असणार आहे. या घोषणेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचे आभार देखील मानण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून याचे थेट वर्णन केले. विशेष म्हणजे यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय भागीदार रिलायन्स इंडस्ट्रीजचे थेट या मोठ्या गुंतवणुकीसाठी आभार मानले. या प्रकल्पात रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मोठी गुंतवणूक केली जात आहे, त्यामुळे रिलायन्स समुहाचे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, आता अमेरिका ऊर्जेच्या वर्चस्वाकडे परतत आहे. मला आज अभिमान आहे की, अमेरिका फर्स्ट रिफायनिंग टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे 50 वर्षात पहिली नवीन अमेरिकन तेल रिफायनरीचा कारखाना उघडत आहे. हा एक 300 अब्ज डॉलर्सचा अमेरिकेच्या इतिहासातील मोठा करार आहे.

हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा करार देखील आहे. हा एक अमेरिकेचा मोठा विजय असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रचंड मोठ्या गुंतवणुकीसाठी आमच्या भारतीय भागीदारांचे आणि त्यांच्या सर्वात मोठ्या खाजगी ऊर्जा कंपनी रिलायन्सचे आभार… असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले. थेट भारताचे आभार मानताना डोनाल्ड ट्रम्प दिसले.

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. ज्यावेळी जागतिक मार्केट अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात अस्थिर आहे, ज्यावेळीच ही मोठी घोषणा करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी भारताकडून अनेक प्रयत्न केली जात आहेत. कारण भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us