डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पाठवले कोरियात अमेरिकन सैन्य, मोठी खळबळ, थेट किम जोंग उनने…

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. इराणविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. थेट अमेरिकेचे सैन्य त्यांनी इराणमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला. यादरम्यानच आता अजून एक मोठी बातमी पुढे येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पाठवले कोरियात अमेरिकन सैन्य, मोठी खळबळ, थेट किम जोंग उनने...
Donald Trump
| Updated on: Mar 09, 2026 | 9:30 AM

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. यादरम्यान या युद्धात थेट अमेरिकेच्या सैन्याला जमिनीवर उतरवण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे. इराणकडून घातक हल्ले केले जात आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या निशाण्यावर थेट इराणचे तेलसाठे आहेत. तेहरान शहरावर घातक हल्ले सुरू आहेत. या युद्धाचा मोठा फटका आखाती देशांना बसत आहे. थेट रडार स्टिटमवर हल्ला करण्यात आला. आखाती देशाचे पर्यटन धोक्यात आहे. हेच नाही तर इराणकडून महत्वाचा समुद्री मार्ग बंद करण्यात आला होता, त्यावेळी खाण्याचेही वांदे होण्याची चिंता आखाती देशांना होती. प्रत्यक्षात इराण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्ध लढत असले तरीही या युद्धाच्या झळा सर्वच देशांना बसत आहेत. कच्च्या तेलाचा मोठा तुडवडा निर्माण झाला असून थेट गॅस निर्यातीवर परिणाम झाला. भारतात देखील गॅसच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली.

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असतानाच कोरियन द्वीपकल्पात अमेरिका आणि उत्तर कोरियामधील तणाव पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. अमेरिकेने सोमवारपासून दक्षिण कोरियासोबत फ्रीडम शील्ड हा मोठ्या प्रमाणात लष्करी सराव सुरू केला आहे, ज्याने मोठी खळबळ उडाली. या युद्ध सरावात हजारो सैनिक सहभागी झाल्याचीही माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 मार्चपर्यंत हा युद्ध सराव सुरू राहिल.

दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने याबाबत बोलताना म्हटले की, आजपासून ते 19 मार्चपर्यंत चालणाऱ्या फ्रिडेल शील्डमध्ये तब्बल 18,000 कोरियन सैन्य सहभागी होईल. अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील हा संयुक्त लष्करी सराव अशा वेळी होत आहे, जेव्हा दक्षिण कोरियाच्या माध्यमांमध्ये अटकळ आहे.

दुसरीकडे, उत्तर कोरिया फ्रीडम शील्ड सरावावर आक्षेप घेत आहे. उत्तर कोरिया अनेकदा या सरावांना आक्रमणाची तालीम म्हणून पाहतो, ज्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता असते. अमेरिका गेल्या काही दिवसांपासून युद्ध सराव करताना दिसत आहे. हेच नाही तर अमेरिकेने परमाणू चाचणी केल्याचे सांगितले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us