AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिका-इस्त्रायल सैन्य थेट घुसणार इराणमध्ये, जमिनीवरून कारवाई, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. यामध्येच आता संघर्श वाढताना दिसतोय. त्यामध्येच आता अमेरिकेकडून जगाची झोप उडवणारा निर्णय घेण्यात आल्याने चांगली खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! अमेरिका-इस्त्रायल सैन्य थेट घुसणार इराणमध्ये, जमिनीवरून कारवाई, थेट..
American and Iran war
| Updated on: Mar 09, 2026 | 8:26 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले. एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. तेहरान अमेरिका आणि इस्त्रायलच्या निशाण्यावर आहे. तेलसाठ्यांवर मोठे हल्ले केले जात आहेत. युद्धाला 10 दिवस पूर्ण झाली असून युद्ध लवकर थांबवण्याचे नाव घेत नाही. इराणकडूनही अनेक निर्बंध लादण्यात आली. अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा  मोज्तबा खामेनेई यांची इराणचा सर्वाेच्च नेता म्हणून निवड करण्यात आली. मात्र, या निवडीनंतर ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटले की, इराणचा पुढचा सर्वोच्च नेता त्यांच्या संमतीशिवाय जास्त काळ टिकू शकणार नाही. हे विधान इराणच्या सत्तेला थेट धक्का देते असल्याचे दिसत आहे. आखाती देशांनाही या युद्धात ओढले गेले आहे. आखाती देश अमेरिकेवर नाराज आहेत. कारण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे अमेरिकेची होती. मात्र, आखाती देशांवर इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत. दुबईसह कतार आणि कुवेतचे मोठे नुकसान झाले.

कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण या युद्धात पराभव स्वीकारताना दिसत नसल्याने अमेरिकेचा थयथयाट बघायला मिळत आहे. शिवाय इराण अधिक घातक होत हल्ले करत असल्याने अमेरिकेसोबतच इस्त्रायलची झोप उडाली. त्यामध्ये आता इराणचे हल्ले कमी करण्यासाठी अमेरिकेने मोठा प्लॅन केला. इराणचे मिसाईल उद्ववस्थ करण्यासाठी अमेरिका सैन्य मैदानात उतरले आहे.

इराणचा युरेनियम साठा जप्त करण्याचा ट्रम्प यांचा प्लॅन आहे. अमेरिकन आणि इस्रायली कमांडो इराणी भूमीवर उतरू शकतात. 450 किलो युरेनियम जप्त करण्याची तयारीचे संकेत ट्रम्प यांनी दिले. कोणत्याही क्षणी अमेरिका आणि इस्त्रायलचे सैनिक इराणमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, इराण ज्याप्रकारे याला उत्तर देईल, त्याची कोणी साधी कल्पना करू शकणार नाही.

इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे तेल अवीव पुन्हा एकदा हादरले आहे. इराणने डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात मध्य इस्रायलला टार्गेट करण्यात आले. ज्यामध्ये तेल अवीवमध्ये तीन लोक जखमी झाले. आता दोन्ही बाजूंनी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट