ट्रम्प यांचे मोठे कांड! एपस्टीनला पाठवलं अश्लील पत्र? अमेरिकेत खळबळ, व्हाईट हाऊसचा तातडीचा खुलासा

Donald Trump obscene letter : अमेरिकेत आता नवीन वाद उफळला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अश्लील पत्र पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर व्हाईट हाऊसने खुलासा केला आहे. या प्रकारामुळे अनेकांना बिल क्लिंटन यांची आठवण झाली.

ट्रम्प यांचे मोठे कांड! एपस्टीनला पाठवलं अश्लील पत्र? अमेरिकेत खळबळ, व्हाईट हाऊसचा तातडीचा खुलासा
डोनाल्ड ट्रम्प यांना दोस्ताना अंगलट
| Updated on: Sep 09, 2025 | 8:40 AM

Donald Trump-Jeffrey Epstein :  अमेरिकेत अचानक माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची जनतेला आठवण झाली. त्याला कारणही तसेच आहे. अमेरिका काँग्रेसच्या हाऊस ओव्हरसाईट समितीच्या डेमोक्रॅट्सने सोमवारी जेफ्री एपस्टीन यांना पाठवण्यात आलेले अश्लील पत्र सार्वजनिक केले. या पत्रावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात ट्रम्प आणि व्हाईट हाऊस यांनी या पत्रातील मजकूर आणि दावा फेटाळला आहे. काय आहे हे प्रकरण?

काय आहे त्या पत्रात?

हे पत्र 2003 मध्ये एपस्टीन यांच्या 50 व्या वाढदिवशी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या अल्बमचा एक भाग होता. एपस्टीन एक अब्जाधीश आहेत. ते कधीकाळी ट्रम्प यांचे अत्यंत लाडके मित्र होते. दोघांमध्ये दोस्ताना होता अशी चर्चा माध्यमांमध्ये त्यावेळी होती. 2019 मध्ये एपस्टीन याने न्यूयॉर्क येथील एका तुरुंगात आत्महत्या केली होती. त्याच्यावर लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि तस्करीचा आरोप होता. त्याविषयीचा खटला त्याच्यावर चालवण्यात येणार होता.

ट्रम्प यांचा दावा काय?

ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण कोणालाही अश्लील पत्र लिहिलेले नाही. अथवा त्या पत्रावर महिलेची आकृती रेखाटलेली नाही. याविषयीचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने छापले होते. ट्रम्प यांनी या दैनिकावर 10 अब्ज डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ते म्हणाले की हे माझे शब्द नाहीत. माझं अक्षर नाही आणि मी सार्वजनिक अथवा खासगीरित्या असं कधी वागलो नाही.

या वृत्तावर व्हाईट हाऊसने नाराजी व्यक्त केली आणि सर्व आरोप फेटाळले. व्हाईट हाऊस प्रेसचे सचिव कॅरोलीन लेव्हिट यांनी एक्सवर याविषयीची भूमिका मांडली. राष्ट्राध्यक्षांनी कागदावर कोणत्याही महिलेचे चित्र रेखाटले नाही. अश्लील मजकूराचा दावा करणारे ते शब्द, अक्षर ही ट्रम्प यांचे नाही. ती स्वाक्षरीही त्यांची नाही असा दावा लेव्हिट यांनी केला आहे.

या दोस्तीला काय नाव देणार

दरम्यान हे पत्र समोर आल्यानंतर अमेरिकेच्या सोशल मीडियात ट्रम्प आणि एपस्टीन यांच्या मैत्रीचे पुरावे म्हणून अनेक छायाचित्र अपलोड होत आहेत. त्यात दोघेही कुटुंबासह एकत्र दिसत आहेत. दोघे एकमेकांचे चांगले मित्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर ट्रम्प यांनी 20 वर्षांपूर्वीच एपस्टीन यांच्याशी दोस्ती तोडल्याचा दावा ट्रम्प समर्थक करत आहेत. या दाव्यामुळे अमेरिकन समाजात ट्रम्प यांच्याविषयी परस्परविरोधी मतं समोर येत आहेत.