डुबवण्यात जो मजा तो पकडण्यात नाही… डोनाल्ड ट्रम्प यांचे जगाची झोप उडवणारे विधान, थेट…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा खुलासा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणी जहाजावर केलेल्या हल्ल्याबद्दल यावेळी बोलताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

डुबवण्यात जो मजा तो पकडण्यात नाही... डोनाल्ड ट्रम्प यांचे जगाची झोप उडवणारे विधान, थेट...
Donald Trump
| Updated on: Mar 10, 2026 | 4:20 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेसह इस्त्रायलकडून इराणवर मोठा हल्ला करण्यात आला. आज अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाला 11 दिवस झाली. युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या बॉम्ब हल्यात 1300 इराणी नागरिकांचा जीव गेला. यासोबतच 170 एकाच शाळेतील मुलींनी हल्ल्यात जीव गमावला. इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, अमेरिकेला आमच्या तेलावर कब्जा हवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना आमच्या तेलावर नियंत्रण हवे आहे. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा फटका अनेक देशांना बसताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली असून महत्वाचा समुद्री मार्ग इराणकडून बंद करण्यात आल्याने भारतात एलपीजी गॅसची निर्यात जवळपास बंद झाली. सिलेंडरच्या किंमती वाढल्या असून सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद करण्यात आली. 

भारताच्या विशाखापट्टनम येथून युद्ध सराव करून इराणच्या दिशेने इराणी युद्धनाैका निघाली होती. श्रीलंकेच्या जवळ ही युद्धनाैका पोहोचली होती, त्यादरम्यान अमेरिकेच्या पाणबुडीने या युद्धनाैकेला जोरात टक्कर दिली आणि ही युद्धनाैका बुडली. 87 इराणी सैनिक यात मारले गेले. आता यावर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेच्या सैन्याने मला म्हटले होते की, जहाज पकडण्यापेक्षा ते बुडवणे अधिक मजेशीर आहे. त्यामुळे त्यांनी ते बुडवले. त्यांचे स्पष्टपणे म्हणणे आहे की, बुडवणे अधिक सुरक्षित आहे. मला वाटते की, खरोखरच हे सत्य आहे. अमेरिकेने युद्धनाैका बुडवल्यानंतर इराणकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.

याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे स्पष्ट शब्दात इराणकडून सांगण्यात आले होते. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, तेहरानला आम्ही अगोदरच झटका दिला आहे. आम्ही 46 इराणी जहाजे बुडवली आहेत? त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? हा पण हे सत्य आहे. इराणच्या कॅपोबिलिटीला आम्ही पूर्णपणे नष्ट केले आहे. इराणची जवळपास लष्करी ताकद संपली आहे.

Follow Us