Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक, ‘हेलिकॉप्टर अन् विमान आजूबाजूला, तितक्यात…’; नेमकं काय घडलं?
Donald trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई सुरक्षेत मोठी घोडचूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका नव्हता, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केलंय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई सुरक्षेत मोठी घोडचूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर आणि एक विमान एकमेकांच्या अगदी जवळ आलं होतं. हेलिकॉप्टर आणि विमान एकमेकांच्या जवळ आल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लष्कराच्या हेलिकॉप्टरने व्हाइट हाऊसने निघाले. त्याचवेळी एअर ट्रॅपिक कंट्रालोरने चुकून रोनाल्ड रेगन विमानतळावर व्यावसायिक विमानांना थांबवलं नाही. सूत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर आणि फ्लोरिडाला जाणारे विमानामध्ये सुरक्षित अंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. परंतु हेलिकॉप्टर आणि विमानाची टक्कर होण्याची शक्यता नव्हती’.
ट्रम्प यांच्या जीवाला धोका नव्हता
एफएएने निवेदनात म्हटलं की, मरीन वन हेलिकॉप्टरशी संबंधित या प्रकरणाची चौकशी करत आहोत. परंतु घटनेवेळी धोकादायक परिस्थिती होती किंवा विमानाची टक्कर होणार होती, असे दिसून येत नाही’. दुसरीकडे व्हाइट हाऊसचे प्रवक्ता कुश देसाई यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितलं की, ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर चालवणारे जगातील सर्वात कुशल पायलट असतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या जीवाला कोणताही धोका नव्हता.
हवाई विमान सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह
दरम्यान, दोन विमाने एकमेकांच्या जवळ आल्याची घटना मागच्यावर्षी देखील घडली होती. दोन्ही विमानांची टक्कर झाल्याने नियम आणखी कडक करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत 67 लोकांचा मृत्यू झाला होता. सरकारने त्या घटनेला निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचं बोललं होतं. ही घटना मागील 2 दशकातील सर्वात भीषण घटना असल्याचे म्हटलं गेलं होतं. गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेनंतर रेगन नॅशन विमानतळाच्या आसपास हेलिकॉप्टर उड्डाणावर कायमस्वरुपी निर्बंध घातले आहे. या घटनेतील एका पीडिताने दाखल केल्याला प्रकरणात एफएए आणि लष्कराच्या निष्काळजीपाणाची भूमिका होती, असे सरकारने कबुल केले होते. तत्पूर्वी, मंगळवारी घडलेल्या घटनेवरून अमेरिकेच्या विमान सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.