AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा मोठा कट, थेट कारमध्येच..

डोनाल्ड ट्रम्प याच्या हत्येचा कट उधळून लावण्यात आला. याबाबत आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. त्यातच पुन्हा एकदा तेच घडले. एका व्यक्तीला अटक करण्यात आले.

अमेरिकेत खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा मोठा कट, थेट कारमध्येच..
Donald Trump
| Updated on: Aug 05, 2026 | 8:06 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा मोठा कट उधळला आहे. लॉस एंजिलिसच्या जवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या नॅशनल गोल्फ क्लबच्या बाहेरून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आले. कॅलिफोर्निया लॉस एंजिलिस काऊंटी शेरिफ विभागाच्या माहितीनुसार, 38 वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. जीनिन जॉन टेले असे त्या व्यक्तीचे नाव असून तो कॅलिफोर्निया येथील डाउनी भागातील रहिवासी आहे. शेरिफ विभागाच्या माहितीनुसार, आरोपीला गोल्फ क्लबच्या पार्किंगमध्ये थांबवण्यात आले. त्याच्या कारची तपासणी करण्यात आली. यादरम्यानच एक पिस्टल आणि बंदी असलेले आर्मर पिसर्सिंग त्याच्याजवळ आढळून आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी गोल्फ क्लब परिसरात फिरणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडीओ काढत होता. तो सुरक्षेवर लक्ष ठेवत होता. संशयित गोष्टी त्याच्याकडून केल्या जात होत्या. हेच नाही तर आरोपीने आपले शस्त्र लपून ठेवले होते. त्याच्यावर असे काही शस्त्र दिसून आली, ज्यावर बंदी आहे. एफबीआय जाइंट टेररिज्म टास्क फोर्स आणि अमेरिकी सीक्रेट सर्व्हिस यांच्याकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केले असून चाैकशी सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प कॅलिफोर्नियाच्या रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या फंडरेजिंग डिनरमध्ये सहभागी होणार आहेत. 26 एप्रिल 2026 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. वॉशिंग्टन येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या डिनर पार्टीत ते सहभागी झाले होते. यादरम्यान अमेरिकेतील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महत्वाचे नेते उपस्थित होते.

यादरम्यान भर पार्टीत गोळीबार झाला होता. ज्यावेळी हा गोळीबार झाला होता, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प देखील तिथेच उपस्थित होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. आता त्यामध्येच पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यात आला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल