AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Hamas War : जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट अल्टिमेटम, तुमच्याकडे फक्त चार दिवस…आता हमास काय करणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी समोर आणलेल्या शांतता करारावर इस्रायलने सहमती दर्शवली आहे. आता फक्त हमास संघटनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांनी हमासला मोठा इशारा दिला आहे.

Israel Hamas War : जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट अल्टिमेटम, तुमच्याकडे फक्त चार दिवस...आता हमास काय करणार?
donald trump
| Updated on: Sep 30, 2025 | 10:01 PM
Share

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप थांबलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता आहे. कारण इस्रायलचे प्रमुख बेंजामीन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर नेतान्याहू यांनी युद्ध थांबवण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी शांततेचा करार केला जाणार आहे. आता फक्त हमास संघटनेची मंजुरी बाकी आहे. दरम्यान, हमासने या करारावर संमती दाखवावी यासाठी ट्रम्प यांनी मोठा आणि महत्त्वाचा इशारा दिला आहे. हमासला सहमती दाखववीच लागेल. असहमती दर्शवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी तंबीच ट्रम्प यांनी दिली आहे.

शांतता करारावर इस्रायलची सहमती

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या इशाऱ्याबद्दल एएनआयने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार हमासला शांती करारावर सहमती दर्शवण्यासाठी तीन ते चार दिवसांची वेळ दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र ट्रम्प कठोर पावलं उचलणार आहेत. मुस्लीम देश, इस्रायल यांनी या शांती करारावर सहमती दाखवलेली आहे. फक्त हमासचा होकार बाकी आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्याला फार महत्त्व आले आहे. या शांती कराराअंतर्गत हमासने बंदी म्हणून ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करावी, अशी अट ठेवण्यात आलेली आहे.

आता सगळ्यांचे लक्ष हमासकडे

ट्रम्प यांनी समोर ठेवलेल्या शांती करारावर इस्रायलने सहमती दर्शवली आहे. या शांती करारात एकूण 20 महत्त्वाचे मुद्दे आहेत. या कराराबाबत मुस्लीम राष्ट्रांनीही सकारात्मकता दाखवली आहे. सौदी अरेबिया, जॉर्डन, यूएई, कतार, इंडोनेशिया, तुर्की, पाकिस्तान, इजिप्त या देशांनीदेखील ट्रम्प यांच्या शांती कराराचे स्वागत केले आहे. हमासने मात्र या शांती करारावर अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष हमासकडे लागलेले आहे. हमासने या कराराला सहमती दर्शवली तर इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध थांबू शकते. पॅलेस्टिनी नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल.

शांती करारात नेमके काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार या शांती करारात हमासच्या सशस्त्र विंगने आपली सर्व शस्त्रे टाकून द्यावीत. हमानसचे बंकर्स तसेच शस्त्रनिर्मितीच्या सर्व सुविधा नष्ट करण्यात येतील. तसेच भविष्यात हमाससोबत कोणतेही सरकार राजकीय भूमिका घेणार नाही. हमासच्या सदस्यांना शांततापूर्ण जीवन जगायचे असेल तर त्यांनी माफी मागावी, त्यांना माफ केले जाऊ शकते, अशा काही मुद्द्यांचा या करारात समावेश आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.