AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासोबतचा पंगा पडला महागात, अमेरिकेचे मोठे नुकसान, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार भडकले, म्हणाले..

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्यानंतर अमेरिकेकडून भारताबद्दल धक्कादायक विधाने करण्यात आली. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारताबद्दल थेट अत्यंत मोठे विधान केले आहे.

भारतासोबतचा पंगा पडला महागात, अमेरिकेचे मोठे नुकसान, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार भडकले, म्हणाले..
Donald Trump and Peter Navarro
| Updated on: Sep 16, 2025 | 8:44 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच भारताला टॅरिफचा महाराजा म्हटले होते. सातत्याने ते भारतावर टीका करताना दिसत आहेत. अमेरिकेचे अधिकारी व्यापार चर्चा करण्यासाठी दिल्लीत येत असतानाच नवारो यांनी भारताबद्दल पुन्हा आग ओकली. मात्र, यादरम्यान त्यांनी एक मोठी गोष्ट देखील मान्य केली.  डोनाल्ड ट्रम्प हेच ही व्यापार चर्चा व्हावी, याकरिता आग्रही होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर भाष्यही केले. मात्र, त्यांच्या वरिष्ठ सल्लागाराची भूमिका अजूनही भारताबद्दलची बदलली नसल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. त्यांनी पुन्हा भारताला टार्गेट केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

पीटर नवारो यांनी म्हटले की, भारताची व्यापार धोरणे अमेरिकन कामगारांसाठी अत्यंत हानिकारक ठरत आहेत.त्याचा परिणाम अमेरिकेत होतो. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. ज्यामध्ये भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला. हेच नाही तर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर भारतानेही सडेतोड उत्तर देत हा चुकीचा व्यवहार असल्याचे म्हटले. अजूनही टॅरिफवरून तणाव सुरू असतानाच भारताचे व्यापार धोरण अमेरिकन कामगारांसाठी धोकादायक असल्याचे थेट नवारो यांनी म्हटले.

सीएनबीसी इंटरनॅशनलला एक मुलाखत पीटर नवारो यांनी दिली. या मुलाखतीतात भारताबद्दल बोलताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, युक्रेनवरील हल्ल्यापासून भारतीय रिफायनर्सचे रशियन रिफायनर्सशी संबंध आहेत. ते आमच्यासोबत व्यापार करत मोठा पैसा कमावतात. यामुळे थेट आमच्या अमेरिकन कामगारांचे नुकसान होते. भारत आमच्याकडून केलेल्या व्यापाराच्या पैशातूनच रशियाकडून तेल खरेदी करतो.

रशियन भारताकडून खरेदी केलेल्या तेलाच्या पैशांनी शस्त्रे खरेदी करतात.  मुळात म्हणजे विषय असा आहे की, गेल्या काही वर्षांपासून भारताला सर्वाधिक धोका हा चीनकडूनच आहे. त्यामुळे पुतिन आणि नरेंद्र मोदी यांना चीनच्या व्यासपीठावर पाहणे फक्त मनोरंजक होते. मला अजिबातच वाटत नाही की नरेंद्र मोदी यांना त्या व्यासपीठावर सुरक्षित वाटले असेल. नवारो हे नेहमीच भारताबद्दल भडकावू विधाने करताना दिसतात. ही पहिली वेळ नाही की, त्यांनी भारताबद्दल असे काही विधान केले. अमेरिकेत महागाई भारतावरील टॅरिफनंतर गगणाला पोहोचली आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी