भारताने डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर झुकवलेच, अमेरिका भारतासोबत ‘तो’ मोठा करार करण्यास तयार, आता..
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर एकच खळबळ उडाली. हेच नाही तर भारतासोबत काही देश पुढे आले आणि त्यांनी अमेरिकेच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला. भारत, चीन आणि रशिया एका मंचावर येण्याचेही तेच मोठे कारण होते. शेवटी अमेरिकेला भारताने झुकवले आहे.

टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेतील मागील काही वर्षांपासूनचे चांगलेच संबंध ताणले आहेत. हेच नाही तर भारतावर थेट टीका केली जात होती. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी मध्यतंरी भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसले. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नसलयाने त्यांचा थयथयाट बघायला मिळाला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेला पोटदुखी उठले आणि त्यांनी थेट म्हटले की, रशिया आणि युक्रेन युद्धाचा शांतीचा मार्ग हा दिल्लीहून जातो. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर युक्रेन-रशिया युद्ध थांबेल. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करून मोठा पैसा कमावत आहे आणि रशियाला पैसा पुरवत आहे. याच पैशांचा वापर रशिया युक्रेन विरोधातील युद्धात वापरतोय.
भारतावर टॅरिफ लावल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार चर्चा बंद होत्या. हेच नाही तर भारतातून अमेरिकेत जाणारी 70 टक्के निर्यात कमी झाली. असे नाही की, निर्यात कमी झाल्याने फक्त भारतालाच फटका बसतोय. अमेरिकेला देखील याचा जोरदार फटका बसताना दिसतोय. अमेरिकेत अंडी, चिकन बटाटे यांचे भाव गगणाला पोहोचल्याचे सध्या बघायला मिळत आहे. भारतातून होणारी निर्यात बंद झाल्याने त्याचा परिणाम थेट अमेरिकेच्या मार्केटवर दिसत आहे.
27 ऑगस्टपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा बंद होती. आता परत एकदा दोन्ही देशांमध्ये समोरासमोर बसून व्यापार चर्चा होणार आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी नवी दिल्लीत येत आहे. त्यांचे नेतृत्व दक्षिण आणि मध्य आशियासाठी सहाय्यक अमेरिकन व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच करतील. या बैठकीला येण्यापूर्वी त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही व्यापाराचे भविष्य पाहण्यासाठी येतोय.
या बैठकीत फक्त व्यापाराशी संबंधित चर्चा होईल. द्विपक्षीय व्यापार करार देखील होतील. विशेष म्हणजे या बैठकीत अमेरिका सीफूडबद्दलचा मोठा करार भारतासोबत करू शकते. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी पुढे येत भारतासोबत व्यापार चर्चा करणार असल्याचे म्हटले. हेच नाही तर त्यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध मजबूत असून नरेंद्र मोदी हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. आता त्यांनी व्यापार मंडळाला चर्चेसाठी पाठवले आहे. अगोदर टॅरिफमध्ये हा दाैरा रद्द करण्यात आला होता.
