AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! टॅरिफच्या वादात अमेरिकेचा मोठा हल्ला, तब्बल इतके मृत्यू, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकी लष्कराने…

डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफनंतर जगात तणावाचे वातावरण बघायला मिळत आहे. फक्त भारतच नाही तर चीनवरही टॅरिफ लावण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट नाटोला पत्र दिले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धक्का देणारा निर्णय घेतल्याचे बघायला मिळतंय.

जग हादरलं! टॅरिफच्या वादात अमेरिकेचा मोठा हल्ला, तब्बल इतके मृत्यू, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकी लष्कराने...
Donald Trump
| Updated on: Sep 16, 2025 | 7:31 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा खुलासा केला असून जग हादरले. अमेरिकेने एक मोठा हल्ला केलाय. ज्यामध्ये तीन लोकांचा जीव गेला. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, व्हेनेझुएलालगतच्या आंतरराष्ट्रीय समुद्रात अमेरिकन सैन्याने ड्रग्ज कार्टेलच्या जहाजावर थेट हल्ला केला. हेच नाही त्यांनी दावा केला की, हे जहाज अमेरिकेच्या दिशेने येत होते आणि यामध्ये मोठ्या संख्येने ड्रग्ज होते. याची माहिती मिळाल्यानंतर हल्ला करत ते जहाज उडवून दिले. या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही दावा केला की, माझ्या आदेशानंतरच हा हल्ला करण्यात आला. मागील काही वर्षांपासून अमेरिकेत ड्रग्ज हा मोठा विषय बनला असून तरूणांनी ड्रग्जच्या आहारी जात आहे. आता अमेरिकेकडून ड्रग्ज विरोधात कडक पाऊले उचलली जात असून आता थेट ड्रग्जने भरलेले जहाजच उडवून देण्यात आलंय.

विशेष म्हणजे अमेरिकेकडून केलेला हा अशाप्रकारचा दुसरा हल्ला आहे. ट्रम्प म्हणाले की, हा हल्ला अमेरिकेच्या दक्षिण कमांड क्षेत्रात हिंसक ड्रग्ज तस्करी नेटवर्क आणि ड्रग्ज दहशतवाद्यांविरुद्ध आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल वर या हल्ल्याचा व्हिडीओ देखील शेअर केलाय. ज्यामध्ये स्पष्ट दिसतंय की, हा हल्ला नेमका कसा करण्यात आला. व्हेनेझुएलाहून अमेरिकेत ड्रग्ज आणणाऱ्या कार्टेलला टार्गेट करण्यात आलय.

अवघ्या काही सेकंदात होत्याचे नव्हते झाल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. एकीकडे युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे तर त्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा काय उद्देश आहे, हे देखील पुढे आलंय. जगाने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता रशियावर मोठा दबाव अमेरिकेकडून टाकला जातोय. भारतावर देखील 50 टक्के टॅरिफ लावला आहे. अजूनही भारतावर निर्बंध लादण्याची धमकी दिली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून 50 टक्के टॅरिफ लावताना दिसले. मात्र, त्यांनी रशियावर टॅरिफ किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. उलट ते पुतिन यांच्यासोबत बैठका घेताना दिसत आहेत. आता भारतानंतर चीनवर टॅरिफ लावण्यासाठीही अमेरिका आग्रही असल्याचे सध्या बघायला मिळत आहे.

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.