अमेरिकेत भारतीय नागरिकाची पत्नीसमोर निघृण हत्या, डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केली अखेर ती मोठी चूक, म्हणाले..
एका भारतीय नागरिकाची अमेरिकेत नुकतास हत्या करण्यात आली. फक्त हत्याच नाही तर त्याचे शरीर चक्क कचराकुंडीत फेकून देण्यात आले. या घटनेने एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. आता यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावून सर्वांनाच मोठा धक्का दिला. आता अमेरिकेतील टेक्सासमध्ये भारतीय नागरिक चंद्र नागमल्लैया यांच्या हत्येबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीये. भारतीय नागरिक चंद्र नागमल्लैया यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे चक्क त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर त्यांची ही हत्या झाली. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेला चक्क बायडेन सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की, काहीही झाले तरीही आपल्या देशात अजिबातच असे घडायला नको होते. यासोबतच त्यांनी या हत्येबद्दल धक्कादायक खुलासेही केली आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारतीय नागरिक चंद्र नागमल्लैया यांची हत्या करणाऱ्या आरोपीवर यापूर्वी बाल लैंगिक अत्याचार, कार चोरी आणि काही गुन्हे दाखल होती. त्याला अटकही करण्यात आली होती. पंरतू बायडेन सरकारने त्याला सोडले होते, जे खरोखरच धक्कादायक आहे. यासोबतच अमेरिकेतील लोकांना मोठे आश्वासन देत त्यांनी म्हटले की, अमेरिकन सरकार बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांबद्दल उदारता दाखवणार नाही.
ट्रम्प म्हणाले की, आमच्या ताब्यात असलेल्या या गुन्हेगारावर खटला चालवला जाईल. त्याच्यावर प्रथम श्रेणीच्या खूनाचा आरोप लावला जाईल आणि प्रत्येक कडक निर्णय घेतले जातील. 10 सप्टेंबर रोजी टेक्सासमध्ये 41 वर्षीय नागामल्लैया यांच्यावर क्रूर हल्ला करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. हेच नाही तर हा हल्ला इतका जास्त भंयकर होता की, त्यांचे शरीर आणि डोके वेगळे करण्यात आले.
मोटेल पार्किंगमध्ये हा हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्याला लाथ मारून फेकून देण्यात आले आणि शरीर उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आले. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी त्यांचा मुलगा आणि पत्नी तिथेच होते. मात्र, आरोपीसमोर ते त्यांना वाचू शकले नाहीत. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने DHS घोषणा केली की, इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने हल्लेखोराला देशातून काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या घटनेने खळबळ उडाली. मागील काही दिवसांपासून भारतीय नागरिकांवरील हल्ले अमेरिकत वाढली आहेत.
