मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफसाठी युरोपवर दबाव, भारतासह चीनच्या अडचणी वाढणार, थेट धमकी देत..
डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टॅरिफनंतर टीका केली जात आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे हुकूमशाहीप्रमाण वागत आहेत. जो देश त्यांच्या अटी मान्य करत नाही, त्याच्यावर टॅरिफ लावला जातोय.

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, म्हणून तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. आता चीनवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे एक पत्र देखील नाटो देशांना दिलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नुकताच मोठे विधान रशियाबाबत केले. डोनाल्ड ट्रम्प हे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात रशियावर कारवाई करण्याची हिंमत होताना दिसत नाही. आता त्यांनी रशियावरील कारवाई, टॅरिफ आणि निर्बंधांबाबत मोठे विधान केले. त्यांनी अमेरिका रशियावर निर्बंध लावेल आणि मोठा टॅरिफ पण मात्र, त्याअगोदर युरोपला रशियावर कारवाई करावी लागणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी रशियावर निर्बंध लादण्यासाठी तयार आहे. मात्र, युरोपला देखील कारवाई करावी लागेल. आताही युरोप हा रशियाकडून तेल खरेदी करत आहे. अजिबात वाटत नाही की, युरोपने रशियाकडून तेल खरेदी करावे. युरोप सध्या जी कारवाई करत आहे ती पुरेशी नाही असे मला स्पष्ट वाटते. मी निर्बंध लादण्यास तयार आहे. पण युरोपला देखील अमेरिकेप्रमाणे निर्बंध लादावे लागतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याबाबतचे पत्र लिहिले आहे.
मला स्पष्टपणे वाटते की, नाटो देशांनी मिळून चीनवर 50 ते 100 टक्के टॅरिफ लावला पाहिजे. चीनने देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून तेल खरेदी बंद करावी. रशिया युक्रेन युद्ध संपल्यानंतर ते टॅरिफ काढू शकतात. पण जोपर्यंत हे युद्ध थांबत नाही, तोपर्यंत चीनवर टॅरिफ लावलाच पाहिजे. चीन हा रशियाकडून तेल खरेदी करणारा सर्वात मोठा देश आहे, असेही त्यांनी म्हटले.
भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. मात्र, त्यावेळी त्यांनी चीनवर टॅरिफ लावला नव्हता. आताही ते चीनवर थेट प्रकारे टॅरिफ लावत नसून नाटो देशांना चीनवर टॅरिफ लादण्यास दबाव टाकत आहेत. मात्र, भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीन एकत्र येताना दिसत आहेत.
