AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia vs US: डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, रशियाने तयार केली आवाजापेक्षा 9 पट वेगवान मिसाईल; एका सेकंदात…

रशियाने पुन्हा एकदा जगाला आपली लष्करी ताकद दाखवली आहे. लष्करी सराव सुरू असताना रशियाने आपल्या खतरनाक शस्त्रांपैकी एक असलेल्या हायपरसोनिक झिरकॉन मिसाईलची चाचणी केली. त्यामुळे अमेरिकेसह नाटो देशांची झोप उडाली आहे.

Russia vs US: डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, रशियाने तयार केली आवाजापेक्षा 9 पट वेगवान मिसाईल; एका सेकंदात...
Russian Missile
| Updated on: Sep 14, 2025 | 7:48 PM
Share

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात सध्या चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका हे युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव टाकत आहे. मात्र आता रशियाने जगाला आपली लष्करी ताकद दाखवली आहे. लष्करी सराव सुरू असताना रशियाने आपल्या खतरनाक शस्त्रांपैकी एक असलेल्या हायपरसोनिक झिरकॉन मिसाईलची चाचणी केली. त्यामुळे अमेरिकेसह नाटो देशांची झोप उडाली आहे. कारण या मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा 9 पट जास्त आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बॅरेंट्स समुद्रात चाचणी

आपल्या तुफान वेगामुळे या मिसाईलला रोखणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे या मिसाईलमध्ये कोणत्याही देशाचा नकाशा बदलण्याची ताकद आहे. रशियाने याबाबत माहिती देताना म्हटले की, ‘ आम्ही बॅरेंट्स समुद्रातील एका टार्गेटवर झिरकॉन (त्सिर्कॉन) हायपरसोनिक क्रूझ मिसाईल डागली. तसेच बेलारूससोबतच्या संयुक्त लष्करी सरावादरम्यान सुखोई एसयू-34 सुपरसोनिक फायटर-बॉम्बर्सनी हल्ले केले.

टार्गेट उडवले

रशियन संरक्षण मंत्रालयाने बॅरेंट्स समुद्रातील झिरकॉन हायपरसोनिक मिसाईलचे एक फुटेज जारी केले आहे. या फुटेजमध्ये दिसत आहे की हे मिसाईल फ्रिगेटवरून उभ्या दिशेने सोडण्यात आले आणि नंतर ते कोनात क्षितिजाकडे वळले. त्यानंतर या मिसाईलने लक्ष्य नष्ट केले अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

रशिया आणि बेलारूसचा संयुक्त सराव

रशियन संरक्षण मंत्रालयाने रशिया आणि बेलारूसच्या संयुक्त सरावाबाबतही माहिती दिली आहे. या सरावाचा उद्देश रशिया किंवा बेलारूसवर हल्ला झाल्यास लष्करातील समन्वय सुधारणे आहे. हा सराव पूर्णपणे बचाव करण्याच्या हेतूने केला जात आहे. या सरावाचा उद्देश कोणत्याही नाटो देशावर हल्ला करण्याचा नाही अशी माहिती दोन्ही देशांनी दिली आहे.

400 ते 1000 किमीची रेंज

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 2019 मध्ये झिरकॉन मिसाईल बनवत असल्याची माहिती दिली होती. हे आवाजाच्या वेगापेक्षा 9 पट वेगाने उडू शकते. रशियामध्ये 3M22 झिरकॉन आणि नाटोमध्ये SS-N-33 नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मिसाईलची रेंज 400 ते 1,000 किलोमीटर आहे. तसेच वॉरहेडचे वजन सुमारे 300-400 किलोग्रॅम आहे. त्यामुळे हे मिसाईल एका सेकंदात जगातील कोणत्याही देशाचा नकाशा बिघडवू शकते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.