युक्रेनचा दणका, मिळाली मोठी सुपरपॉवर, ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला; नेमकं काय होणार?

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी ट्रम्प यांनी एक प्रस्ताव समोर ठेवला आहे. पण हा प्रस्ताव वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी थेट फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळेच ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

युक्रेनचा दणका, मिळाली मोठी सुपरपॉवर, ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला; नेमकं काय होणार?
donald trump and vladimir putin and volodymyr zelensky
| Updated on: Aug 17, 2025 | 7:02 PM

Russia Ukraine War : अलास्का येथील ट्रम्प-पुतिन बैठकीनंतर आता येत्या 18 ऑगस्ट रोजी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ट्रम्प, झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांत महत्त्वाची बैठक होणार आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी ट्रम्प यांनी एक प्रस्ताव समोर ठेवला आहे. पण हा प्रस्ताव वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी थेट फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळेच ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बैठकीला कोण कोण येणार?

रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प-झेलेन्स्की आणि युरोपीयन देशांच्या प्रतिनिधींची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये झेलेन्स्की यांच्यासोबत युरोपियन कमिशनचे प्रमुख युरसुला वॉन डेर लेयन असणार आहेत. तसेच जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही उपस्थिती असणार आहे. सोबतच नाटो संघटनेचे सरचिटणीस मार्क रुट, ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यादेखील असणार आहेत. युक्रेनमधील शांतता कराराचे फ्रेडरिक मर्झ आणि इमॅन्युएल मॅक्रॉन हे या बैठकीत युरपोपीय युनियनतर्फे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. जर्मनीच्या मतानुसार या बैठकीत सुरक्षेची हमी, प्रादेशिक मुद्दे, तसेच रशियाच्या आक्रमक भूमिकेविरोधात युरोपीयन देशांचे युक्रेनला असलेले समर्थन या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

युक्रेनची टोकाची भूमिका जमीन देणार नाहीच

पुतिन यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची मागणी सोडून दिली आहे. आता ते तत्काळ शांतीकरार व्हावा असे म्हणत आहेत. शस्त्रसंधीपेक्षा तत्काळ शांतीकरार करणे फायदेशीर ठरू शकते, असे ट्रम्प यांची भूमिका आहे. युक्रेनने रसियाला डोनबास हा संपूर्ण भाग देऊन टाकला तर तत्काळ शांतीकरार होऊ शकतो, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. युक्रेनने मात्र रशियाला एक इंचही जमीन न देण्याची भूमिका घेतलेली आहे. विशेष म्हणजे युरोपीय देशांनीही युक्रेनच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

आता ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला

युक्रेनच्या या भूमिकेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढला आहे. कारम अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांनी मी निवडून आलो तर महिन्याभरात रशिया-युक्रेन युद्ध थांबवने असे आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत अनेक प्रयत्न करूनही हे युद्ध थांबलेले नाही. युद्ध थांबावे यासाठी ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध लादण्याचाही इशारा दिला होता. रशियाची नाकेबंदी व्हावी यासाठी तसे काही निर्णयही त्यांनी घेतले होते. मात्र अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता आगामी काळात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.