
Donald Trump Arab Countries Visit: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची सूत्र घेतली. त्यानंतर ते पहिल्यांदा मध्य पूर्व देशाचा दौरा करणार आहेत. सौदी अरेबियापासून त्यांचा हा प्रवास सुरु होणार आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर सौदी क्राऊन प्रिन्स यांनी अमेरिकेत 600 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर क्राउन प्रिन्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री जगजाहीर झाली आहे. ट्रम्प यांच्या या दौऱ्यात त्यांना बोइंग 747-8 जम्बो जेट गिफ्टमध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्याची किंमत 400 मिलियन डॉलर (3.3 हजार कोटी रुपये) आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना कतारच्या शाही परिवाराकडून मिळणारे आलीशान बोइंग 747-8 जम्बो जेट भविष्यात राष्ट्रध्यक्षांच्या विमानात बदलता येऊ शकणार आहे. ट्रम्प हे जानेवारी 2029 पर्यंत हे विमान वापरु शकणार आहे. सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी एअर फोर्स वन या विमानाचा वापर केला जातो. हे विमान खूप जुने झाले आहे. सौदीकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणारे हे विमान कोणत्या महलपेक्षा कमी असणार नाही.
डोनाल्ड ट्रम्प 13 मे रोजी मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेतून रवाना होणार आहे. ते सौदी अरेबिया, यूएई, कतार या देशांचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात इस्त्राईलचा दौर नाही. परंतु हमास आणि इस्त्रायल युद्धावर त्यांच्याकडून चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचा हा दौरा 16 मे पर्यंत असणार आहे. ट्रम्प यांचा अरब देशांचा हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. या भेटीदरम्यान त्यांच्या अजेंड्यावर इस्रायल-हमास युद्धविराम चर्चा होईल. तसेच तेल, व्यापार, गुंतवणूक करार आणि सेमीकंडक्टर निर्यात यावरही चर्चा होईल.
डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणाऱ्या बोइंग 747-8 जम्बो जेटमध्ये अल्ट्रा-शानदार इंटीरियर आहे. त्यात खूप मोठे बेडरुम आहे. सहा ते सात लोकांसाठी कॉन्फ्रेंस एरिया आहे. अनेक बाथरुम आहेत. त्यात दोन मजले आहे. यामधील प्रत्येक गोष्ट लग्झरी आहे. दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले आहे की, ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रध्यक्षांच्या वापरासाठी बोईंग 747 अपग्रेड करण्यासाठी संरक्षण कंत्राटदार एल३हॅरिसला नियुक्त केले आहे. हे विमान कतारच्या राजघराण्याकडूनही वापरले गेले आहे.