Expliner : देशात आणीबाणी जाहीर, पर्यटकांचा आवडता देश, पण स्वतःच ओढविला विनाश…

एके काळी पर्यटन स्थळ आणि जगातील सर्वोच्च केळी निर्यातदार म्हणून देशाची ओळख होती. परंतु, अमेरिकेतील संघटित गुन्हेगारीचे संशोधन करण्यात माहिर असलेल्या वॉशिंग्टन थिंक टँकने या देशाचे वर्णन 'युरोप आणि अमेरिकेतील कोकेन सुपरहायवे' असे केले आहे.

Expliner : देशात आणीबाणी जाहीर, पर्यटकांचा आवडता देश, पण स्वतःच ओढविला विनाश...
EcuadorImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 6:41 PM

नवी दिल्ली | 11 फेब्रुवारी 2024 : एका फिर्यादीला गोळ्या घालण्यात आल्या. हॉस्पिटलवर हल्ला झाला, बॉम्बच्या धमक्या दिल्या गेल्या आणि एक कुख्यात गुंड तुरुंगातून बेपत्ता झाल्यानंतर कैद्यांनी तुरुंगातील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले, एका टीव्ही पत्रकाराचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आले. या गेल्या काही महिन्यातील घटना या देशात घडल्या जो कधी काळी सर्वात शांत देश ओळखला जात होता. जगभरातील पर्यटकांचा तो आवडता देश होता. पण, या देशाने स्वतःला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. अनेक मोठे देश त्याचे विरोधक झाले आहेत. त्यामुळे या देशात आता आणीबाणी जाहीर झाली.

जगभरात इक्वाडोर हा देश शांत आणि पर्यटकांचा आवडता देश होता. ब्राझील आणि कंबोडिया या दोन देशांच्या शेजारी असलेला हा देश शांततेमुळे कधीही जगाच्या नजरेत आला नाही. पण, मागील काही वर्ष हा देश जगाच्या नजरेत आला आहे. ड्रग माफियांशी जोडलेल्या हिंसाचाराच्या वादळाने इक्वाडोरला शांत पर्यटन स्थळापासून जागतिक ड्रग व्यापाराच्या प्रमुख केंद्रात बदलले आहे.

इक्वाडोर देश एके काळी पर्यटन स्थळ आणि जगातील सर्वोच्च केळी निर्यातदार देश म्हणून ओळखला जात होता. परंतु, अमेरिकेतील संघटित गुन्हेगारीचे संशोधन करण्यात माहिर असलेल्या वॉशिंग्टन थिंक टँकने इक्वाडोर देशाचे वर्णन ‘युरोप आणि अमेरिकेतील कोकेन सुपरहायवे’ असे केले आहे.

इक्वाडोर देशाच्या या बदलामागे त्याची भौगोलिक परिस्थिती हे प्रमुख कारण मानले जाते. कोलंबिया आणि पेरू हे दोन देश कोकाचे जगातील सर्वोच्च उत्पादक आहेत. हे देश शेजारी असल्याने इक्वाडोरच्या सीमा कोकोने वेढल्या गेल्यात.

कोलंबियाच्या सशस्त्र गट FARC ने 2016 मध्ये शांतता करारावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून अंमली पदार्थांच्या व्यापारापासून तो देश दूर गेला. गेली अनेक कोलंबिया देश अंमली पदार्थांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. पण, त्याची जागा लहान लहान गट आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांनी घेतली. अंमली पदार्थ परदेशी बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी त्यांनी नवीन मार्ग अवलंबले. यातूनच ते पॅसिफिक किनाऱ्यावर असलेल्या इक्वेडोरमधील ग्वायाकिल सारख्या बंदरांकडे आकर्षित झाले. त्यामुळे हा देश आता एक महत्त्वाचे कोकेन वितरण केंद्र बनले आहे.

कोकेनची तस्करी देशाबाहेर प्रथम बोटीद्वारे आणि नंतर विमानाने केली जाते. कधी कधी केळीच्या कंटेनरमध्ये लपवून, अमेरिका आणि युरोपमधील बाजारपेठांमध्ये कोकेन नेले जाते. परिणामी इक्वेडोरच्या लहान लहान टोळ्या मेक्सिकोसारख्या इतर देशांतील ड्रग माफियांच्या जवळ आल्या आहेत. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम (UNODC) च्या अहवालानुसार या टोळ्या अधिक शक्तिशाली झाल्या. त्यामुळे इक्वाडोरमध्ये 2016 आणि 2022 च्या दरम्यान खून होण्याच्या घटनांमध्ये चौपटीने वाढ झाली असे म्हटले आहे.

इक्वाडोरच्या सरकारी आकडेवारीनुसार, 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांत 12 ते 17 वयोगटातील 1,300 मुलांना खून, अंमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रे बाळगल्याच्या संशयावरून अटक केली आहे. ही मुले शाळेतून पळून जाऊन बंडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात टोळीत सामील झाली होती. शहरी भागांजवळील गरीब भागात ही टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. त्यामुळे मुले त्यांच्या प्रभावाखाली येतात. जानेवारी महिन्यात येथे एकामागून एक हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष डॅनियल एनगोबा यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.