Explained: पाकव्याप्त काश्मीरमध्ये बंडाचे वारे, पाकिस्तानविरोधात का खवळली जनता… काय आहे या भागाचा इतिहास?
Tension in PoK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये जालियनवाला बागसारखे हत्याकांड झाले. तर पाकिस्तानचा लष्करप्रमुख फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर अहमद शाह हे जनरल रेजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर ठरले आहेत. पीओकेमध्ये आंदोलकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात 11 हून अधिकांचा मृत्यू तर 200 हून अधिक जण जखमी झाले.

History Of PoK: पाकिस्तानने बळकावलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये राजकीय असंतोष उफाळला आहे. गेल्या 70 हून अधिक वर्षांपासून इथली जनता पाकिस्तानची दडपशाही सहन करत आहे. जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी इथं एक कळसूत्री सरकार नावाला बसवलं आहे. इस्लामाबादवरून येणारे आदेश अंमलात आणणे इतकेच या सरकारचे काम आहे. स्वतंत्र काश्मीरचे चॉकलेट देऊन पाकिस्तान येथील नैसर्गिक संपत्तीचा वारेमाप वापर करत आहे. आता राजकीय असंतोषाचा उद्रेक झाला आहे. जनताही रस्त्यावर उतरली आहे. पाकिस्तानी लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी येथे आंदोलकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात 11 हून अधिक जण ठार झाले. तर 200 अधिक जण जखमी झाले. गर्भवती महिलांवरही पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणानंतर हे जालियनवाला हत्याकांड असल्याचा आरोप स्थानिक करत आहे. तर पाकिस्तानचा लष्करप्रमुख फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर अहमद शाह याला जनरल रेजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर असे म्हटले जाऊ लागले आहे. जगातील अनेक देशांनी या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. भारताने या घटनाक्रमावर तीव्र हरकत नोंदवली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारताविषयी अनुकूल...