Explainer : Iran- Israel युध्दात तिघांचाही विजयाचा दावा; कुणाच्या पदरात पडलं काय, एका क्लिकवर समजून घ्या

Iran- Israel Ceasefire : तर मोठ्या गोंधळानंतर काल इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध बंदी झाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इराण आणि इस्त्रायल या तिघांनी विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे जग बुचकाळ्यात पडले आहे. कुणाच्या पदरात पडलं काय? हा तात्पुरता युद्ध विराम की पुन्हा दोन्ही देश एकमेकांवर तुटून पडणार?

Explainer : Iran- Israel युध्दात तिघांचाही विजयाचा दावा; कुणाच्या पदरात पडलं काय, एका क्लिकवर समजून घ्या
विजय तरी कुणाचा? काय पडलं पदरात?
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 27, 2025 | 11:48 AM

इराण आणि इस्त्राईल यांच्यात सुरू असलेल्या १२ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर शस्त्रसंधी जाहीर झाली. संपूर्ण जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिकेने उडी घेतली, परिणामी जागतिक युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली होती. या युद्धातील तिन्ही देश, अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांनी आपापली पाठ थापटून घेतली आहे. या युद्धात आपलाच विजय झाल्याचा गुलाल उधळला आहे. कोण कुणावर भारी पडलं याचं प्रत्येकाचं गणित वेगळं आहे. अर्थात इस्त्रायल आणि इराण यांनी एकमेकांना चांगलंच झुंजवलं यात शंका नाही. युद्धाला निर्णायक परिस्थितीत आणण्याचे काम अमेरिकेने अखेरच्या टप्प्यात केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इराण आणि इस्त्रायल या तिघांनी विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे जग बुचकाळ्यात पडले आहे. कुणाच्या पदरात पडलं काय? हा तात्पुरता युद्ध विराम की पुन्हा दोन्ही देश एकमेकांवर तुटून पडणार? याचे दावे करण्यात येत आहेत. गेल्या 25 वर्षात मध्य-पूर्वेत अनेक स्थित्यांतरं झालीत. मात्र युद्ध काही...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा