स्वर्गापेक्षाही सुंदर 5 विदेशी ठिकाणे, एकदा गेलं तर परत येण्याची इच्छा होणार नाही, आजच करा नियोजन

जर तुम्हाला देखील समुद्रकिनारी मस्ती करायची असेल तर विदेशातील ही पाच ठिकाणे आहेत स्वर्गापेक्षाही सुंदर. एकदा भेट द्याल तर...

| Updated on: Feb 15, 2026 | 4:05 PM
1 / 6
दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन काही अविस्मरणीय क्षण अनुभवायचे असतील तर जगातील काही ठिकाणे तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरू शकतात. जी तुमची ट्रिप आयुष्यभरासाठी खास बनवू शकतील.

दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन काही अविस्मरणीय क्षण अनुभवायचे असतील तर जगातील काही ठिकाणे तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरू शकतात. जी तुमची ट्रिप आयुष्यभरासाठी खास बनवू शकतील.

2 / 6

जर तुम्हाला प्राचीन संस्कृती आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान एकाच ठिकाणी पाहायचे असेल तर जपान हा उत्तम पर्याय आहे. राजधानी टोक्यो हे अत्याधुनिक शहर असले तरी येथे पारंपरिक चहा समारंभ, मंदिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येतो.

3 / 6

अ‍ॅडव्हेंचरची आवड असणाऱ्यांसाठी स्वालबार्ड (नॉर्वे) हे स्वप्नवत ठिकाण आहे. बर्फाच्छादित प्रदेशात स्नोमोबाइलिंग आणि कयाकिंगसारख्या रोमांचक क्रियांचा अनुभव घेता येतो. येथील आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करताना ध्रुवीय अस्वल आणि इतर वन्य प्राणी जवळून पाहण्याची संधी मिळते.

4 / 6

सुखसोयी आणि वैभवाच्या बाबतीत दुबईचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा, भव्य शॉपिंग मॉल्स आणि वाळवंटातील सफारी हे या शहराचे आकर्षण आहे.

5 / 6

गोंगाटापासून दूर, समुद्राच्या लाटांमध्ये वेळ घालवायचा असेल तर कॅरिबियन द्वीपसमूह तुमची वाट पाहत आहेत. पांढऱ्या शुभ्र वाळूचे किनारे आणि प्रायव्हेट रिसॉर्ट्स यामुळे हे द्वीप जगप्रसिद्ध आहेत.

6 / 6

मालदीव आपल्या समुद्रावर उभारलेल्या वॉटर व्हिलांसाठी प्रसिद्ध आहे. छोट्या-छोट्या बेटांमुळे येथे मिळणारी प्रायव्हसी विशेष आहे. खोलीच्या खिडकीतून थेट समुद्रात उतरून रंगीबेरंगी मासे पाहणे, स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेणे आणि समुद्राखालील रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे हे येथील संस्मरणीय अनुभव आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us