मेडे… मेडे… पायलटचे शेवटचे शब्द, 32000 फुटावरून कोसळलं विमान, एका क्षणात सर्वच संपलं

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये Learjet 60 विमान 32 हजार फुटांवरून कोसळले. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. एअर ट्रॅफिक कंट्रोल रेकॉर्डिंगमध्ये पायलटचे अखेरचे 'मेडे' शब्द आणि प्रवाशांचे किंकाळणे ऐकू आले. अति वेगाने खाली येत असल्याचे पायलटने कळवले, त्यानंतर एका क्षणात सर्वकाही संपले. अपघाताचे कारण अजून अस्पष्ट आहे.

मेडे... मेडे... पायलटचे शेवटचे शब्द, 32000 फुटावरून कोसळलं विमान, एका क्षणात सर्वच संपलं
Learjet 60 crash
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 11:47 AM

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये ग्रीनएक्रसमध्ये रविवारी निवासी भागात एक लियरजेट 60 विमान कोसळलं. मिसाइलप्रमाणेच हे विमान जमिनीवर धाडकन आदळलं. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल रेकॉर्डिंगच्या मते, अपघाताच्या शेवटच्याक्षणी विमानातील प्रवासी जीवाच्या आकांताने किंचाळत होते. आमच्याकडे वेळ नाहीये. ते लोक मदतीसाठी ओरडत आहेत. किंचाळत आहेत. धावा करत आहेत, असं या रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड झालं आहे.

विमान कोसळण्यापूर्वी पायलटचं संभाषण समोर आलं आहे. आपण 8,000 फूट खाली जात आहोत. मेडे मेडे… आम्ही 10,000 फूट प्रति मिनिट वेगाने खाली येत आहोत. आम्ही ओव्हर स्पीडच्या स्थितीत आहोत. आणि 20,000 फूट प्रति मिनिट वेगाने खाली कोसळत आहोत. आम्ही जमिनीला धडक देणार आहोत, असं पायलटने सांगितल्याचं रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी एका महिला क्रू मेंबर्सच्या किंचाळण्याचा आवाजही ऐकायला येत आहे. हे देवा, आमच्याकडे वेळच राहिलेला नाहीये, असं ही महिला म्हणते. अन् त्यानंतर धाडकन हे विमान जमिनीवर जाऊन आदळतं.

Loading...

कुठे चाललं होतं विमान?

विमान जेव्हा जमिनीला धडकणार होतं, तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणाला, नोव्हेंबर टू, ब्रावो डेल्टा, मी तुमच्या सोबत आहे. माझ्याशी संवाद साधा. प्लेनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीचंही शेवटचं संभाषण समोर आलं आहे. आमचं विमान 60 डिग्रीवर झुकलं आहे. आम्ही नियंत्रण गमावलं आहे, असं हा व्यक्ती बोलताना दिसत आहे.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, लियरजेट 60 विमानाने टेक्सासच्या ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम इंटरनेशनल विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. हे विमान बहामासच्या नॉर्थ एलेउथेराकडे जात होतं. विमान 35,000 फुटावरून पूर्वेला जात होतं. तेव्हा पायलटने टर्बुलन्स, बर्फ पडल्याचं आणि प्रचंड पाऊस, हिमवर्षाव होण्याची सूचना दिली होती. त्याने 2,000 फूट आणखी वर जाण्याची परवानगी मागितली होती.

10000 फूट प्रति मिनिट वेगाने खाली

डेटानुसार, विमान आधी सुमारे 10000 फूट प्रति मिनिटच्या वेगाने खाली आलं, त्यानंतर 20,000 फूट प्रति मिनिट आणि शेवटी 30,000 फूट प्रति मिनिटच्या अधिक वेगाने खाली पडलं. जमिनीवर कोसळण्यापूर्वी विमान उजव्या बाजूला झुकलं होतं.

नंतर फ्लाइट डेटामधून नवीन माहिती समोर आली आहे. विमान खाली पडण्यापूर्वी 32,000 फूट प्रति मिनिट वेगापेक्षा अधिक वेगाने खाली आलं होतं. विमानाचा शेवटचा सिग्नल जवळपास 8,750 उंचावर रेकॉर्ड केला गेला होता. मात्र, विमान दुर्घटनाग्रस्त कसं झालं हे अद्याप समजू शकलेलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us