फ्लायदुबईतील प्रवाशांना आणण्यासाठी इस्त्रायलचं विमान होतं तयार, अचानक सौदी अरेबियाने मदत का नाकारली?

फ्लायदुबईतील प्रवाशांना आणण्यासाठी इस्त्रायलचं विमान सज्ज होते. परंतु सौदी अरेबियाने त्यांनी विनंती नाकारली. जाणून घ्या नेमकं कारण.

फ्लायदुबईतील प्रवाशांना आणण्यासाठी इस्त्रायलचं विमान होतं तयार, अचानक सौदी अरेबियाने मदत का नाकारली?
flydubai
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 2:16 PM

दुबईहून (Dubai) तेल अवीवला जाणाऱ्या प्लायदुबईच्या विमानात एका पायलटने दुसऱ्या पायलटवर हल्ला केला. या वादानंतरही धाडस  आणि प्रसंगावधान राखत एका पायलटने विमान सौदी अरबच्या दिशेने वळवलं. त्यानंतर विमानाचं तबूक विमानतळावर सुखरूप इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. या घटनेनंतर इस्त्रायलने प्रवाशांना परत आणण्यासाठी स्वत:चे विमान पाठवण्यासाठी सौदी अरेबियाकडे परवानगी मागितली. परंतु सौदी अरिबायाने मदत नकार दिला, अशी माहिती रॉयटर्स वृत्त संस्थने सूत्रांच्या हवाल्याने दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार,  सौदी अरेबियात अडकलेल्या इस्त्रायलच्या प्रवाशांना परत आणण्यासाठी इस्त्रायलने लष्करी विमान पाठवण्यासाठी विनंती केली होती. परंतु सौदी आणि इस्त्रायलचे राजनैतिक संबंध नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, इस्त्रायली हवाई दल प्रवाशांना परत आणण्यासाठी विमान पाठण्याची तयारी करत होते. परंतु सौदी सरकारने प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सौदीला अमेरिकेच्या मध्यस्थीने ‘अब्राहम करारात’ सामील होण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत असताना इस्त्रायलने विनंती केली. या कराराअंतर्गत अनेक अरब देशांनी इस्त्रायलसोबत संबंध प्रस्थापित केलेत. परंतु पॅलेस्टिनी राज्याच्या निर्मितीचा स्पष्ट मार्ग दिसत नाही, तोपर्यंत या करारात सामील होणार नाही, असे सौदीचे म्हणणे आहे. तर सौदी अरेबिया आणि इस्त्रायलचे औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत. फ्लायदुबईच्या विमानातील घटनेनंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्त्रायली आणि परदेशी विमान कंपन्यांची सुरक्षा वाढवण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Loading...

बेंजामिन नेतान्याहू काय म्हणाले?

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं की, ‘विमानात एका पायलटने दुसऱ्या पायलटवर चाकूने हल्ला केला. परंतु दुसऱ्या पायलटने त्या पायलटचा विमान पाडण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या विमानातील सर्व प्रवासी इस्त्रायली होते. विमान खाली कोसळताना एका इस्त्रायली प्रवाशी बोललो, त्याने विमान कोसळू लागल्याचे सांगितले. या हल्ल्यादरम्यान एक पायलट हळूच कॉकपिटमध्ये शिरला. या पायलटने सुखरूप इमर्जन्सी लँडिग केलं. त्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी हल्ला झालेल्या विमानाच्या पायलटला हिरो म्हटलं. स्मित मच्छार असे अनेकांचा जीव वाचवणाऱ्या भारतीय वंशाच्या पायलटचे नाव आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us