AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय पायलट भिडला, जमिनीपासून 41000 फूट उंचावर विमानात थरार, थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही..

भारतीय वंशाचे पायलट स्मित मच्छार यांनी 180 लोकांचा जीव वाचवला. गंभीर जखमी असतानाही त्यांनी शेवटपर्यंत हार मानली नाही. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनीही थेट भारतीय पायलटचे काैतुक केले. विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला जात असताना हल्ला झाल्यानंतरही भारतीय पायलटने हार मानली नाही.

भारतीय पायलट भिडला, जमिनीपासून 41000 फूट उंचावर विमानात थरार, थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही..
Smit Machhar Donald Trump Flydubai plane
| Updated on: Oct 01, 2026 | 8:32 AM
Share

भारतीय वंशाचे पायलट स्मित मच्छार यांनी जी कामगिरी केली, ज्यानंतर त्यांचे जोरदार काैतुक केले जात आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्मित मच्छार यांना खरा हिरो म्हटले. को पायलटकडून आपल्या स्वत:वर मोठा हल्ला झालेला असतानाही कशाचीही परवा न करता स्मित मच्छार यांनी गंभीर जखमी असतानाही विमानाला क्रॅश होण्यापासून वाचवले. यासोबतच 180 लोकांचा जीव वाचवला. फ्लाईदुबईच्या विमानात जे घडले, त्यानंतर जग हैराण झाले. ओमानच्या को पायलटने जे केले, त्याचा साधा विचारली कोणी केला नाही. भारतीय पायलटमुळे आज तब्बल 180 लोक जिवंत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या चांगल्याच आरोग्यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात आहेत.

इस्त्रायलचे पंतप्रधान आणि त्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही स्मित यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत त्यांना खरा हिरो म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लाईदुबईमधील भारतीय पायलट स्मित मच्छार खरे हिरो असल्याचे म्हटले. दुबईहून तेल अवीवकडे विमान निघाले होते. को पायलटने स्मित यांच्यावर हल्ला केला. त्याला विमान क्रॅश करायचे होते.

गंभीर जखमी असतानाही पायलटने मदत मागितली. त्याने अनेक कोड पाठवून आपत्कालीन स्थिती असल्याचे मेसेज दिले. यादरम्यान जखमी असताना त्याने कॉकपिटचा दरवाजा उघडला. यानंतर विमानातील प्रवाशीही को पायलटला पकडण्यासाठी पुढे धावले. त्यानंतर स्मित यांनी गंभीर जखमी असतानाही विमान सुरक्षित साैदीत उतरवले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटले की, याबाबत माझे बोलणे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झाले.

भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला झाला ते गंभीर स्थितीत होते. नेतन्याहू यांनी मच्छार यांना खरा हिरो म्हटले. ते खरेच हिरो आहेत. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे ते मदत मागण्यास यशस्वी झाले. त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि मदतही मागितली. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारतीय पायलटे काैतुक केले. भारतीय पायलटचे फक्त इस्त्रायल आणि अमेरिकाच नाही तर जगभरातून काैतुक केले जात आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...