भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्यानंतर विमान क्षेत्रावर मोठे संकट, बड्या कंपन्यांची..

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. ज्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर आता नवीन संकट जगापुढे उभे आहे. एअरलाईन्स कंपन्यांचा ताण वाढला आहे.

भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्यानंतर विमान क्षेत्रावर मोठे संकट, बड्या कंपन्यांची..
Flydubai
| Updated on: Oct 17, 2026 | 12:40 PM

फ्लायदुबईचे विमान दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवकडे निघाले होते. या विमानात को पायलटने थेट पायलटवर गंभीर हल्ला केला. या हल्ल्याने खळबळ उडाली. पायलटवर हल्ला करून कोणत्याही परिस्थितीमध्ये को पायलटला हे विमान क्रॅश करायचे होते. भारतीय पायलट स्मित मच्छार याने ओमानी पायलटचा हा डाव उधळून लावला. ओमानी को पायलट हमाम अल हम्मामी याने पायलट स्मित याच्यावर हल्ला करूनही त्यांनी हार मानली नाही. गंभीर जखमी असतानाही त्यांनी आपत्कालीन कोड पाठवले. त्यामुळे विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे एटीसीला समजले. आपले धैर्य दाखवत विमानाला क्रॅश होण्यापासून रोखले. त्यातच आता जागतिक नागरी उड्डाण क्षेत्रावर नवीन मोठे संकट पुढे उभे आहे.

जागतिक नागरी उड्डाण क्षेत्रात राष्ट्रीयत्वाच्या आधारे निर्बंध लादले जाऊ लागले आहेत. त्यामुळे वेगळ्या नव्या मोठ्या समस्या या निर्माण झाल्यात. इस्त्रायलकडून 31 देशांच्या पायलट आणि केबिन क्रूवर निर्बंध लादण्यात आलीत. एअर फ्रान्स आणि युनायडेट एअरलाईन्स सारख्या कंपन्यांच्या क्रूवरही निर्बंध लागू करण्यात आलीत. राजकीय तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तव विमान उड्डाण क्षेत्रात निर्बंधांचा वापर करण्यात आला.

Loading...

ज्यामुळे आता या निर्बंधांमुळे एअरलाईन्स कंपन्यांना पायलट आणि केबिन क्रूचा ड्युटी चार्ट तयार करण्याचा डोक्याला मोठा ताण झाला. एअरलाईन्सला प्रत्येक कर्मचाऱ्याचे नागरिकत्व तपासावे लागत आहे. तेल अविवसारख्या संवेदनशील ठिकाणी जाणाऱ्या विमानांमध्ये हे निर्बंध लादण्यात आलीत. संबंधित देशांचे पायलट आणि क्रू मेंबर त्या विमानांमध्ये नाहीत ना… याची काळजी घ्यावी लागतंय.

मुळात म्हणजे या गोष्टीमुळे एअरलाईन्सवर मोठा ताण येत आहे. ज्यामुळे ही प्रक्रिया किचकट झाली असून पैसेही अधिकचे मोजावी लागत आहेत. भारतीय पायलट स्मित मच्छार याचे काैतुक जगभरातून केले जात आहे. स्मित मच्छार याच्यामुळे 180 लोकांचा जीव वाचला. इस्त्रायलने त्यांचा सर्वात मोठा सन्मान स्मित मच्छार यांना देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी स्मित मच्छार यांचे आभारही मानले .

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us