AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानी पायलटबद्दल हादरवणारी माहिती, थेट ऑस्टेलियात..

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानात धक्कादायक घटना घडली. को पायलटने विमान क्रॅश करण्याचा कट रचला. मागील काही वर्षांपासून तो यावर काम करत होता. सध्या या को पायलटची चाैकशी सुरू आहे. याबाबत आता एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत.

भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणाऱ्या ओमानी पायलटबद्दल हादरवणारी माहिती, थेट ऑस्टेलियात..
Smit Machhar and Oman co pilot
| Updated on: Oct 10, 2026 | 3:04 PM
Share

दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या दुबईप्लायच्या विमानात जे घडले, ते जगासाठी धक्कादायक होते. थेट ओमानच्या को पायलटने भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करत विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांपासून त्याने हा कट रचला. हेच नाही तर याकरिताच तो दुबईफ्लाय कंपनीत नोकरी करत होता. त्याने अगोदर अभ्यास केला की, नक्की कोणत्या कंपनीचे विमान थेट तेल अवीवकडे जाते. त्यानंतर त्याने फ्लायदुबईत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. 180 जण असलेले हे विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न ओमानच्या को पायलटकडून करण्यात आला. त्याने पूर्ण कट रचला, त्यानुसारच त्याने मोठा हल्ला भारतीय पायलटवर केला. मात्र, भारतीय पायलट स्मित मच्छार याने ओमानच्या पायलटचा प्रयत्न उडवून लावला. इस्त्रायलच्या जमिनीवर हा कट घडवून आणायचा होता.

या विमानात जवळपास इस्त्रायली नागरिक होते. स्मित मच्छार यांनी गंभीर जखमी होऊनही हा हल्ला रोखला. याबाबत आता मोठे खुलासे होत आहेत. ओमानच्या को पायलटबद्दल एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. 2024 मध्येच त्याच्यावर कारवाई झाली होती. भारतीय पायलटमुळे एक मोठा दहशतवादी हल्ला टळला. त्यातच आता धक्कादायक माहिती पुढे आली.

युएईच्या अटार्नी जनरल हमाद सैफ अल शामसीने फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या घटनेबद्दल मोठा खुलासा केला. तपासात एक बाब पुढे आली की, कट्टरपंथी विचारधारेसोबत हा सुरूवातीच्या काळातच पायलट ऑस्टेलियात संपर्कात आला. ओमानी पायलट अल हम्मामी 2015 ते 2017 मध्ये मेलबर्नच्या आरएमआयटी विश्वविद्यालयमध्ये शिक्षण घेत होता. युएईच्या तपासानुसार, 2017 मध्ये त्याने जहालवादी साहित्य वाचण्यास सुरूवात केली.

ऑनलाईन त्याने काही व्हिडीओही बघितले. दहशतवादी संघटना आणि आत्मघाती हल्ले कसे करायचे हे तो सतत बघत होता. आरएमआयटीशी संबंध मस्जिदमध्येही तो जात होता. त्यावेळी तो काही लोकांच्या संपर्कात आला. माय सेंटरशी संबंधित लोकांच्या थेट संपर्कात आला. हे केंद्र एक लेबनानी व्यक्ती अबू हम्जा चालवत होता. यातील हादरवणारी बाब म्हणजे 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्याला प्रेरित होतच त्याने पायलट बनवण्याचा निर्णय घेतला.

ओमान एअर, रॉयल एयर, मोरक्को आणि त्यानंतर फ्लायदुबई असा त्याचा प्रवास राहिली. फ्लायदुबईमध्ये काम करत असताना त्याने तेल अवीवला काही वेळ जात असताना माहिती गोळा केली. दोन वेळा गेल्यानंतर तिसऱ्यावेळी त्याने हल्लाचा कट रचला. मात्र, क्रू मेंबरमध्ये त्याचा जवळचा मित्र असल्याने त्याने नियोजित कट ऐनवेळी पुढे ढकलला.

Follow Us
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...