
पाकिस्तानी नागरिक असलेल्या बाप लेकांनी मोठा हल्ला ऑस्ट्रेलियात केला. या हल्ल्याचे काही व्हिडीओही पुढे आली आहेत. दोघे फळ विक्रीचा व्यवसाय ऑस्ट्रेलियात करत. फिरण्यासाठी जात असल्याचे कुटुंबियांना सांगून त्यांनी थेट मोठा दहशतवादी हल्ला केला. ज्यात 16 ऑस्ट्रेलियान नागरिक ठार झाले. त्यामध्येच ऑस्ट्रेलियाच्या एका नागरिकाने प्राणाची बाजी लावत चक्क दहशतवाद्यावर झडप मारत त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली. यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. व्हिडीओमध्येही स्पष्टपणे दिसत होते की, एका व्यक्तीने दहशतवादी गोळीबार करत असताना मागून त्याच्यावर झडप घातली आणि थेट त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली आणि त्याच्यावरच गोळीबार केला. यातील एक दहशतवादी इस्लामी केंद्रात जात असल्याची माहिती पुढे आली. सध्या ऑस्ट्रेलियाच्या तपास यंत्रणांकडून याबद्दलचा तपास केला जात आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारने या हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले. ऑस्ट्रेलियातील या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानातील दहशतवाद पुढे आला आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा या हल्ल्यामध्ये हात असल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगितले जात आहे. उजव्या विचारसरणीचे नेते आणि खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.
खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी म्हटले की, पाकिस्तान हा शरिया कायद्यानुसार चालणारा एक अत्यंत धोकादायक आणि मागासलेला देश आहे. हा हल्ला करून त्याने पुन्हा एकदा जगाला याची आठवण करून दिली. कुख्यात अल-कायदा दहशतवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपून बसला होता. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले की, पाकिस्तान हा 100 टक्के दहशतवादी देश आहे.
Pakistan is 100% terror state.
A dangerous sharia shithole.
Osama Bin Laden lived there for many years.
The #bondibeach terrorists are from Pakistan.
I got many fatwas to kill me from Pakistani mullahs.
We all should boycott and isolate #Pakistan! https://t.co/omhpOYj3fU
— Geert Wilders (@geertwilderspvv) December 15, 2025
शरियासारख्या धोकादायक कायद्या असलेला हा एक नक्कीच नीच देश आहे. मला पाकिस्तानी मौलवींंकडून अनेक धमक्या मिळाल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठिंबा दिला जातो, हे जगजाहीरच आहे. भारतामध्येही विविध दहशतवादी कारवाई करण्याचा प्रयत्न पाकिस्तानातून केला जातो. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनीच मोठा हल्ला केला होता. त्यात पर्यटकांना धाडधाड गोळ्या झाडण्यात आल्या.