
भारतीय सैन्याने भारत-बांग्लादेश सीमेच्या जवळ मिजोरम येथे चौथा सैन्य तळ बनवण्याच्या योजनेवर काम सुरु केलं आहे. सिलीगुड़ी कॉरिडोर (चिकन नेक) सुरक्षा अजून भक्कम करणं हा त्यामागे उद्देश आहे. भारताला ईशान्येकडेच्या राज्यांशी जोडणारा हा 22 किलोमीटरचा पट्टा देशासाठी खूप महत्वाचा आहे. बांग्लादेश आणि म्यानमार सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेता भारताचं हे पाऊल महत्वपूर्ण मानलं जातय. याआधी भारतीय सैन्याने पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाम या ठिकाणी तीन सैन्य तळ स्थापित केले आहेत. सिलीगुडी कॉरिडोरच्या चारही बाजूला सुरक्षा घेरा तयार करण्यात आलाय. बांग्लादेशातील अनेक भारत विरोधी शक्ती चिकन नेकशी छेडछाड करण्याची धमकी देत असतात. त्यामुळे इथली सुरक्षा मजबूत करणं आवश्यक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 19 डिसेंबर 2025 रोजी पूर्व कमांडचे लेफ्टनेंट जनरल आर. सी. तिवारी यांनी मिजोरमच्या संभाव्य भागाचा दौरा केला होता.
सोबतच सीमा सुरक्षा पथकाकडून (BSF) पूर्व सीमेवर मोठी तयारी सुरु आहे. BSF 85 बॉर्डर आऊट पोस्ट्सला आधुनिक कंपोजिट हबमध्ये अपग्रेड करत आहे. त्या शिवाय पुढच्या पाच वर्षात मिजोरम आणि कछार सेक्टरमध्ये 100 पेक्षा जास्त बंकर, ब्लास्ट-प्रूफ शेल्टर आणि अन्य संरक्षण रचना बनवल्या जातील.
भारताची पकड अजून मजबूत होईल
सैन्य आणि BSF च्या या संयुक्त तयारीकडे ईशान्य भारताची सुरक्षा मजबूत करण्याची रणनिती म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे सिलीगुडी कॉरिडोर आणि सीमावर्ती भागात भारताची पकड अजून मजबूत होईल. भारतीय सैन्याने ईशान्येकडची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सिलीगुड़ी कॉरिडोर क्षेत्रात अनेक पावलं उचलली आहेत. अलीकडे सैन्याने धुबरी (आसाम), किशनगंज (बिहार) आणि चोपडा (पश्चिम बंगाल) इथे तीन नवीन सैन्य गॅरीसन स्थापित केले आहेत.
हा निर्णय का घेण्यात आलाय?
नोव्हेंबर 2025 च्या डिफेन्स रिपोर्टनुसार बांग्लादेश आणि चीनचं संभाव्य आव्हान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. खासकरुन शेख हसीना बांग्लादेशात सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर बदलती क्षेत्रीय स्थिती लक्षात घेऊन सुरक्षेविषी सतर्कता वाढली आहे.
बांग्लादेशच्या सीमेजवळ मिजोरम येथे चौथा सैन्य तळ बनवण्याच्या योजनेवर विचार चालू आहे. या प्रस्तावाची 17 माउंटेन स्ट्राइक कॉर्प्सकडून समीक्षा सुरु आहे. सीमावर्ती भागातील हालचालींवर लक्ष ठेवणं आणि त्वरित प्रत्युत्तराच्या कारवाईची क्षमता वाढवणं हा त्यामागे उद्देश आहे.