‘मला जॉर्जिया मॅलोनी खूप आवडतात’; डोनाल्ड ट्रम्प यांची इटलीच्या पंतप्रधानांवर स्तुतीसुमने

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी यांच्यात बैठक झाली. ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत मॅलोनी यांनी टॅरिफसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी ‘मला जॉर्जिया मॅलोनी खूप आवडतात, जॉर्जिया मॅलोनी यांच्यासारखं कुणीच नाही,’ असं ट्रम्प म्हणालेत.

‘मला जॉर्जिया मॅलोनी खूप आवडतात; डोनाल्ड ट्रम्प यांची इटलीच्या पंतप्रधानांवर स्तुतीसुमने
डोनाल्ड ट्रम्प, जॉर्जिया मेलोनी
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Apr 18, 2025 | 11:22 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवरील टॅरिफबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. या भेटीत दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. ट्रम्प म्हणाले की, युरोपियन युनियनवरील टॅरिफ हटवण्याची आम्हाला सध्या कोणतीही घाई नाही. दरम्यान, ट्रम्प यांनी जॉर्जिया मॅलोनी यांचे खुलेआम कौतुक केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी यांचे कौतुक करताना म्हणाले की, “तुमच्यासारखे जगात कोणीच नाही.’’ ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला त्या (जॉर्जिया मॅलोनी) खूप आवडतात. मला वाटते की त्या एक उत्कृष्ट पंतप्रधान आहेत आणि इटलीमध्ये चांगले काम करत आहेत.’’

‘ जॉर्जिया मॅलोनींमध्ये कमालीच्या प्रतिभावान आहे. त्या जगातील सर्वोत्कृष्ट नेत्यांपैकी एक आहेत, त्यांचे व्यक्तिमत्त्व करिश्माई आहे आणि त्यांच्यासारखा कोणीही नाही. आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि दोन्ही देश एकत्र पुढे जात आहेत,’’ असं ट्रम्प यावेळी म्हणालेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जॉर्जिया मॅलोनी यांना महान पंतप्रधान म्हणून संबोधले असून त्यांनी संपूर्ण युरोपमध्ये खळबळ माजवली आहे. मी त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या दिवसापासून ओळखतो आणि त्यांच्यात आश्चर्यकारक प्रतिभा आहे यावर माझा नेहमीच विश्वास आहे,’’ असंही ट्रम्प म्हणालेत.

व्हाईट हाऊसमध्ये जॉर्जिया मॅलोनी आणि ट्रम्प यांनी व्यापार, इमिग्रेशनवरील शुल्क आणि पाश्चिमात्य राष्ट्रवाद यावरही चर्चा केली.

यावेळी ट्रम्प म्हणाले की, त्यांना घाईगडबडीत व्यावसायिक व्यवहार करायचे नाहीत. या टॅरिफचा अमेरिकेला मोठा फायदा होत आहे. मात्र, यावेळी ट्रम्प यांनी युरोपियन युनियनसोबत करार करण्याचे संकेतही दिले. यावेळी मालोनी म्हणाल्या की, इटालियन कंपन्या अमेरिकेत 10 अब्ज युरोची गुंतवणूक करतील आणि इटली अमेरिकेकडून ऊर्जेची आयात वाढवेल.

20 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या जॉर्जिया मॅलोनी या एकमेव युरोपियन नेत्या होत्या. जॉर्जिया मॅलोनी आणि ट्रम्प यांची अनेक बाबतीत समान मते आहेत. इमिग्रेशनपासून तस्करीपर्यंत सर्व गोष्टी हाताळण्याबाबत दोघेही सारखेच विचार करतात.

“मला जॉर्जिया मॅलोनी खूप आवडतात…”

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला त्या (जॉर्जिया मॅलोनी) खूप आवडते. मला वाटते की त्या एक महान पंतप्रधान आहेत आणि इटलीमध्ये उत्तम काम करत आहेत. संपूर्ण युरोपात खळबळ माजवणारे महान पंतप्रधान म्हणून जॉर्जिया मॅलोनी यांचे वर्णन केले जाते. मी त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या दिवसापासून ओळखतो आणि त्यांच्यात आश्चर्यकारक प्रतिभा आहे यावर माझा नेहमीच विश्वास आहे.’’