आजीने लायब्ररीमधून आणलेलं पुस्तक 83 वर्षांनंतर नातवानं केलं परत, फाईन ऐकून म्हणाल एवढा कुठं दंड असतो का राव?

आजीनं आणलेलं पुस्तक नातवाने तब्बल 83 वर्षांनी परत केलं आहे. या पुस्तकासोबत त्याने ग्रंथालय प्रशासनाला एक चिठ्ठी देखील लिहिली होती.

आजीने लायब्ररीमधून आणलेलं पुस्तक 83 वर्षांनंतर नातवानं केलं परत, फाईन ऐकून म्हणाल एवढा कुठं दंड असतो का राव?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2025 | 3:46 PM

सॅन अँटोनियो पब्लिक लायब्ररीमधून भाडे करारावर घेतलेलं एक पुस्तक तब्बल 82 वर्षांनी लायब्ररीला पुन्हा वापस करण्यात आलं आहे. त्याच्यासोबत एक पत्र देखील जोडलं होतं. रिपोर्टनुसार “योर चाइल्ड, हिज फॅमेली,अँण्ड फ्रेंड्स” असं या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक फ्रांसेस ब्रूस स्ट्रेन यांनी लिहिलेलं आहे. 1943 साली हे पुस्तक सॅन अँटोनियो पब्लिक लायब्ररीमधून घेण्यात आलं होतं, त्यानंतर ते यावर्षी जून महिन्यात पुन्हा एकदा त्या लायब्ररीमध्ये जमा करण्यात आलं.

नातवानं लिहिली चिठ्ठी

तब्बल 83 वर्षांनंतर हे पुस्तक लायब्ररीला परत करण्यात आलं आहे, या पुस्तकासोबत एक चिठ्ठी देखील होती, ज्यामध्ये लिहिलं होतं की, नुकतंच माझ्या वडिलांचं निधीन झालं आहे. मला वारसा म्हणून त्यांची पुस्तकानं भरेली कपाटं मिळाली आहेत. मी हे पुस्तक परत करत आहे, पण माझ्याकडे या पुस्तकावर लागणारा फाइन भरण्या एवढे पैसे नाहीयेत, माझी आजी देखील एवढे पैसे देऊ शकणार नाही. ही चिठ्ठी वाचल्यानंतर सॅन अँटोनियो पब्लिक लायब्ररीने या पुस्तकावर लागलेला ओव्हर ड्यू माफ करण्याचा निर्णय घेतला.

या मुलाचे वडील हे आकरा वर्षांचे असताना त्याच्या आजीने या लॅब्ररीमधून हे पुस्तक आणलं होतं. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं एक प्रकारे मार्गदर्शकच होतं. त्याच्या आजीने आपल्या कुटुंबातील प्रत्येक पिढीच्या व्यक्तीला हे पुस्तक वाचून दाखवलं होतं. मात्र तब्बल 83 वर्षांनी नातवाने हे पुस्तक परत करण्याचा निर्णय घेतला, त्याने हे पुस्तक वापस तर केलंच सोबत एक चिठ्ठी देखील लिहिली. ती चिठ्ठी वाचून लॅब्ररीने दंड माफ करण्याचा निर्णय घेतला.

किती होता दंड?

पुस्तकाच्या कव्हर पेजवरच छापण्यात आलं होतं. जर पुस्तक परत करण्यास विलंब झाला तर प्रति दिन तीन सेंट इतका दंड आकारला जाईल, जो गेल्या 83 वर्षांमध्ये सोळा हजार डॉलरवर पोहोचला होता. म्हणजेच त्याला 13 लाख रुपये एवढा दंड भरावा लागला असता. मात्र लॅबरीने हा दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पुस्तक खूपच चांगल्या स्थितीमध्ये आहे, आम्ही पुस्तकासोबतच पत्र देखील वाचलं आहे, या मुलाची परिस्थिती पाहाता आम्ही दंड माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी यावर प्रतिक्रिया लॅबरी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.