लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा खेळ खल्लास; सलमानला धमकी देणारा गँगस्टर…, थेट अमेरिकेत मोठी कारवाई

अमेरिकेच्या एजन्सीने लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा खेळ खल्लास करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या एजन्सीला बिश्नोईच्या गँगचा बडा मासा गळाला लागलाय.

लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा खेळ खल्लास; सलमानला धमकी देणारा गँगस्टर..., थेट अमेरिकेत मोठी कारवाई
harry boxer
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 11:10 AM

लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कुख्यात टोळीचा गँगस्टर हॅरी बॉक्सरला अमेरिकेतून अटक करण्यात आली आहे. बिश्नोईच्या गँगमध्ये हॅरीचे तिसरं स्थान होतं. तो अमेरिकेत बसून भारतात गँग चालवत होता. याच हॅरी बॉक्सरने दिग्दर्शक  रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. त्याने बॉलिवूडमधील अभिनेत्यांना धमक्या दिल्या होत्या. हॅरी बॉक्सरआधी गँगस्टर हिमांशू भाऊला देखील अमेरिकेच्या यंत्रणेने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईचा गँगचा गँगस्टर हॅरी बॉक्सरला कॅलिफोर्नियातून अटक केली. अमेरिकेची सुरक्षा यंत्रणाने हॅरीला विशेष खबर मिळाल्यानंतर अटक केली. भारतीय वेळेनुसार, हॅरीला शुक्रवारी रात्री अटक केली. हॅरी बॉक्सर हा गेल्या अनेक वर्षांपासून बिश्नोईच्या गँगमध्ये सक्रिय होता. त्यांच्याविरोधात हत्या, धमकावणे, खंडणी वसुलीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आताच कुख्यात गँगस्टरच्या मुसक्या आवळण्यास अमेरिकेच्या एजन्सीने सुरुवात केली आहे. रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी त्याने घेतली होती. या टोळीने बॉलिवडूच्या कलाकारांची झोप उडवली होती. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील मेम्बरने टायगर श्रॉफच्या कारवरही गोळीबार केला होता. या घटनेने सिनेकलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us