Henley Passport Index : भारताच्या तुलनेत चीनचा पासपोर्ट किती ताकदवान, चीनी लोकांना किती देशात व्हिसा फ्री प्रवेश

China Passport: हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या मते चीनचा पासपोर्ट भारताच्या पासपोर्ट पेक्षा खूपच मजबूत आहे. चला तर पाहूयात चीनी नागरिकांनी किती देशात व्हिसा फ्री प्रवेश आहे हे पाहूयात...

Henley Passport Index : भारताच्या तुलनेत चीनचा पासपोर्ट किती ताकदवान, चीनी लोकांना किती देशात व्हिसा फ्री प्रवेश
modi vs xi jinping
| Updated on: Feb 15, 2026 | 5:16 PM

China VS India Passport: ग्लोबल पासपोर्ट रॅकींगमुळे देशाची डिप्लोमेटीक ताकद, आर्थिक परिणाम आणि आंतरराष्ट्रीय करार यांचा अंदाज येत असतो. हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या मते ग्लोबल मोबिलिटी आणि व्हिसा मुक्त प्रवेशच्या बाबतीत चीनचा पासपोर्ट भारताच्या तुलनेत खुप मजबूत स्थितीत आहे.  भारतीय पासपोर्ट होल्डरना ५६ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश आहे. तर चीनच्या नागरिकांना किती देशात व्हिसा फ्री एण्ट्री ते पाहूयात….

चीनच्या पासपोर्टचे रँकींग आणि ग्लोबल पोझिशन काय ?

चीनचा पासपोर्ट जगाच्या तुलनेत ५६ व्या स्थानावर आहे. गेल्या दहा वर्षात चीनने त्यांची स्थिती मजबूत केली आहे. यंदा चीन पासपोर्ट २८ पायऱ्यांनी वर पोहचला आहे. साल २०२५ च्या तुलनेत यात सुमारे १० रँकची सुधारणा झाली आहे. चीनी पासपोर्ट होल्डरना आता जगातील ८२ ते ८५ देशात व्हिसा फ्री वा व्हिसा ऑन अरायव्हल एक्सेस मिळतो.

२०२६ मध्ये भारताची पासपोर्ट रँकिंग

हेनले पासपोर्ट रँकींगनुसार भारताचा पासपोर्ट २०२६ मध्ये जगाच्या ७५ व्या क्रमांकावर आहे. भारताने देखील गेल्यावेळेपेक्षा जास्त प्रगती केली आहे. हा गेल्या वर्षाच्या तुलनेत १० पायऱ्यावर वर आला आहे. भारतीय पासपोर्ट होल्डर्सना आता जगातील ५६ देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अराव्हल एक्सेस आहे. भारताचा पासपोर्ट रँकींगमध्ये सुधारणा नक्की आहे. परंतू चीन आणि भारत यांच्या मोबिलीटी गॅप प्रचडं मोठा आहे.

व्हिसा फ्री एक्सेस गॅप

दोन्ही देशांच्या दरम्यान चीनच्या पासपोर्टमध्ये २६ ते २९ डेस्टीनेशन जास्त आहे. ८५ देशामध्ये चीनी नागरिकांना भारतीयांच्या तुलनेत जास्त ट्रॅव्हल फ्रीडम आहे. चीनी पासपोर्ट होल्डर अनेक मोठ्या टुरिझम आणि बिझनस डेस्टीनेशनवर व्हिसा फ्री ट्रॅव्हल करु शकतात. वा व्हिसा ऑन अरायव्हल मिळवू शकतात. यात एंटीगुआ आणि बरम्युडा, डोमिनिका, इंडोनेशिया, कतार, सौदी अरब आणि थायलंड सारखे देशांचा यात समावेश आहे. चीनने अलिकडेच मलेशिया आणि सोलोमन आयलँड सारख्या देशांसोबत रेसिप्रोकल व्हिसा फ्री करार देखील साईन केला आहे.

चीनचा व्हिसा पॉलिसीचा विस्तार

मजेशीर गोष्ट अशी की चीनने टुरिझम आणि इकॉनॉमिक एक्टीव्हीटीला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे ७४ देशांच्या नागरिकांसाठी एक तर्फी व्हिसा फ्री प्रवेश देखील सुरु केला आहे. हे पाऊल ग्लोबल कनेक्टिव्हीटीला प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याच्या बीजींगच्या स्ट्रॅटजीला दर्शवते.

भारतचा बदलता व्हिसा लँडस्केप

भारताचे रँकींग देखील वाढले असून एक्सेसमध्ये काही बदल झाले आहेत. इराण आणि बोलिव्हीया सारख्या देशांनी भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री वा व्हिसा ऑन अरायव्हल एक्सेसना संपूर्णपणे समाप्त केले आहे, तसेच गाम्बिया सारख्या नव्या डेस्टीनेशन भारतीय पर्यटकांसाठी खुले केले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us