ICT verdict on Sheikh Hasina : बांगलादेशात हाय अलर्ट, संपूर्ण जगाच्या नजरा, शेख हसीना यांच्यावरील न्यायालयाच्या निकालापूर्वी थेट मोठे आदेश…

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतात आहेत. मागील काही महिन्यांपासून त्या भारतात राहत आहेत. त्यांच्या वाईट काळात भारताने त्यांना आश्रय दिला. आज बांगलादेशात तणावाची स्थिती असून थेट मोठे आदेश देण्यात आली.

ICT verdict on Sheikh Hasina : बांगलादेशात हाय अलर्ट, संपूर्ण जगाच्या नजरा, शेख हसीना यांच्यावरील न्यायालयाच्या निकालापूर्वी थेट मोठे आदेश...
Sheikh Hasina
| Updated on: Nov 17, 2025 | 1:27 PM

बांगलादेशातील सत्तापालटाला एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. मोठा गोंधळ बांगलादेशमध्ये झाला होता. हजारोंच्या घरात लोक रस्त्यावर उतरले. आता बांगलादेशात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बांगलादेशमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत. 5 ऑगस्ट 2024 रोजी सत्तापालटानंतर देश सोडून माजी पंतप्रधान शेख हसीना पळाल्या. त्यावेळी जोरदार निर्देशन केली जात होते. लोक पंतप्रधानांच्या घरात शिरले होते. जवळपास एका वर्षाहून अधिक काळापासून बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान भारतातच आहेत. शेख हसीना आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवरील आरोपांवर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) आज निकाल देणार आहे. त्यापूर्वी बांगलादेशामध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळतंय.

भारताने शेख हसानी यांना राहण्यास आश्रय दिल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर बांगलादेशाकडून भारताला टार्गेट केले जात आहे. आजच्या सुनावणीदरम्यान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने या घटनेला प्रतिसाद म्हणून देशव्यापी बंदची हाक दिली आहे. देशात हिंसाचार भडकण्याची भीती असल्याने बांगलादेश हाय अलर्टवर आहे. हेच नाही तर ढाका मेट्रोपॉलिटन पोलिस आयुक्त शेख मोहम्मद सज्जाद अली यांनी हिंसाचार करणाऱ्यांना दिसताच गोळीबार करण्याचे थेट आदेश दिले आहेत.

सध्याच्या परिस्थितीला बांगलादेशात तणावाची स्थिती आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भारत बांगलादेशाच्या सीमेवर देखील भारताने सुरक्षा अधिक वाढवली आहे. बांगलादेशात ऑगस्टमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप आहे. शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यावर या सुनावणीच्या अगोदर निशाणा साधला. अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांना बांगलादेशाच्या स्वाधीन करा, अशी मागणी बऱ्याचदा भारताकडे केलीये.

शेख हसीना यांनी एका मुलाखतीत युनूस यांच्यावरती टीका करत गंभीर आरोप केली आणि म्हटले की, दहशतवादी संघटनांशी सहयोग करून बांगलादेश अतिरेकी विचारसरणीने प्रभावित होत आहे. बांगलादेश सोडण्याबद्दल म्हणाल्या की, मातृभूमी सोडण्याने मला प्रचंड वेदना झाल्या. आर्थिक विकासासाठी आम्ही उचललेली पावले उद्ध्वस्त झाली,  बांगलादेशच्या लोकांवर पूर्ण विश्वास आजही मला आहे. ते नक्कीच लोकशाही निवडतील. आजच्य सुनावणीकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत.