Israel vs Houthi : हमासने जी नीचता,क्रूरता दाखवली त्यापेक्षाही इस्रायलवर भयंकर हल्ल्याच प्लानिंग, वाळवंट, जमीन खोदून बाहेर काढणार मिसाइल

Israel vs Houthi :7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर भीषण हल्ला केला. यात 1000 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. वृद्ध, महिला, मुलं, गर्भवती महिलांची अत्यंत निदर्यतेने हत्या करण्यात आली. त्यानंतर इस्रायलच भयानक रुप दिसलं. आता हमासने जसा हल्ला केलेला, त्यापेक्षाही भयानक हल्ला इस्रायलवर करण्याची तयारी सुरु आहे.

Israel vs Houthi : हमासने जी नीचता,क्रूरता दाखवली त्यापेक्षाही इस्रायलवर भयंकर हल्ल्याच प्लानिंग, वाळवंट, जमीन खोदून बाहेर काढणार मिसाइल
Israel
| Updated on: Sep 27, 2025 | 9:56 AM

येमेनचे हुती बंडखोर आता फक्त हल्ल्याची तयारी करत नाहीयत, तर डोंगर आणि वाळवंटात लपून शस्त्रांचे कारखाने उभे करत आहेत. लांब रेंजची मिसाइल्स आणि जबरदस्त ड्रोन बनवणारे हुती आता इस्रायलसाठी थेट धोका बनले आहेत. म्हणूनच अलीकडे येमेनची राजधानी सनावर हवाई हल्ले केले. इस्रायलने काही दिवसांपूर्व ऑपरेशन मूविंग पॅकेज अंतर्गत सनावर जबरदस्त एअरस्ट्राइक केला. यात 65 बॉम्ब टाकण्यात आले. हुतींच कमांड सेंटर आणि गोदाम उद्धवस्त केलं. हुतींनी ड्रोनद्वारे इस्रायलच्या इलात शहरावर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात इस्रायलमध्ये 20 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

इराण आपल्या सहकारी संघटनांना जी पद्धत शिकवतो, हुती सुद्धा तेच करत आहेत असं अधिकाऱ्याने सांगितलं. बाहेरुन शस्त्र मागवण्याऐवजी ते आपल्याच देशात शस्त्रास्त्र उद्योग उभारत आहेत. वजनदार, अचूक आणि रेंजमध्ये न येणारे ड्रोन, मिसाइलचा यामध्ये समावेश आहे. हुती हमासप्रमाणे मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा इस्रायली गुप्चर यंत्रणेला अंदाज आहे. 7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर भीषण हल्ला केला. यात 1000 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला.

अल-अक्सा किंवा जेरूसलम फ्लड काय?

हुतींच्या प्लानिंगला अल-अक्सा किंवा जेरूसलम फ्लड म्हटलं जातय. यात हुती स्थानिक मिलिशियाची भरती करतायत. घुसखोरीच मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देत आहेत. एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार, कधी असा हल्ला झाला तर तो थेट येमेनमधून नाही, तर जॉर्डन किंवा सीरियामधून होऊ शकतो.

इस्रायलने टास्क फोर्सवर काय जबाबदारी सोपवली?

इस्रायलने धोका लक्षात घेऊन येमेनमधून गोपनीय माहिती मिळवण्यासाठी विशेष टास्क फोर्स बनवला आहे. हुतींसाठी शस्त्र बनवणारे कारखाने आणि कमांड सेंटर्सचा नकाशा तयार करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. म्हणजे वेळीच हे कारखाने उद्धवस्त करता येतील. वेळीच कारवाई केली नाही, तर हुती अचूक खोलवर हल्ला करणारी लांब पल्ल्याची मिसाइल विकसित करु शकतात. हा फक्त इस्रायलसाठी नाही, तर संपूर्ण क्षेत्रासाठी धोका असेल. या महिन्यात अमेरिकेने सुद्धा हुतींची फंडिग रोखण्यासाठी 24 पेक्षा जास्त कंपन्यांवर बंदीची कारवाई केली आहे.